सेंच्युरियन पराभव : धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको होती - गावस्कर
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको हवी होती, असे मत लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेय. टीम इंडियाचा सेंच्युरियन कसोटीत झालेल्या पराभवानंतर गावस्करांनी हे मत व्यक्त केले.
सेंच्युरियन : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको हवी होती, असे मत लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेय. टीम इंडियाचा सेंच्युरियन कसोटीत झालेल्या पराभवानंतर गावस्करांनी हे मत व्यक्त केले.
आजच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला जो पराभवाचा सामना पत्करावा लागला, त्यावरुन संघात धोनी हवा होता, असे मत गावस्कर यांनी यावेळी व्यक्त केले. कारण संघात नव्या खेळाडूंना महत्व देताना त्यांच्या गुणवत्तेचा विचार केलेला नाही. त्यामुळे खेळात भावना पेक्षा खेळ महत्वाचा असल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. सेंच्युरियन कसोटीत विकेटकीपर ऋद्धिमान साहा जायबंदी झाल्यानंतर पार्थिव पटेलला संधी देण्यात आली. मात्र, पार्थिवने मोक्याच्यावेळी अनेक चुका केल्या. त्यामुळे सामन्याचे चित्र पालटले.
हाशिम अमलाच्या झेल घेतला असता तर त्याने ३० वरुन ८२ धावा केल्या नसत्या. तसेच डीन एल्गरचा साधा झेल न पकडल्याने त्याने ६१ धावा कुटल्यात. त्यामुळे आफ्रिकेला दोन जिवदान मिळाल्याने त्यांना धावगती वाढविता आली. हे कारण टीम इंडियाच्या पराभवालाही कारणीभूत आहे.
पार्थिव पटेलच्या चुकांची समीक्षा गावस्कर यांनी समालोचन करताना केली. त्यामुळे धोनी हा कर्णधार म्हणून योग्य होताच. शिवाय विकेटकीपरची उणीवही भासली नसती, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले. धोनीने निवृत्ती घ्यायला थोडी घाई केल्याचे मतही नोंदवले.