मुंबई : महेंद्रसिंह धोनीला मास्टरमाईंड का म्हणतात याचं उत्तर तुम्हाला अजूनही कळलं नसेल तर हा व्हिडीओ पाहाणं चुकवू नका. धोनी हा एक उत्तम फलंदाज, यशस्वी कर्णधार आणि खेळाडूसोबत मैदानाची उत्तम पारख असलेला सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. धोनी नेहमी डोक्याने खेळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीचे अंदाज चुकत नाहीत. मैदानात अख्खी बाजी पलटवण्याचं सामर्थ्य धोनीकडे आहे असं म्हणतात. चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्यात विराट कोहलीला आऊट करण्यासाठी चक्क धोनीनं ट्रॅप रचला. त्यामध्ये कोहली फसला आणि आऊट झाला. धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


धोनीनं शेवटच्या क्षणी डाव रचला आणि कोहलीला मैदानात उद्ध्वस्त केलं. कोहली क्रिझवर आला तेव्हा धोनीनं फिल्डिंग बदलली. अपेक्षेप्रमाणे कोहलीनं शॉर्ट खेळला आणि तो कॅचआऊट झाला. 


धोनीने लावलेल्या फिल्डिंगमध्ये कोहली फसला आणि कॅचआऊट झाला. हे पहिलीच वेळ नाही याआधी देखील धोनीने अशा अनेक लोकांची विकेट काढली आहे.