IND vs ENG, Dhruv Jurel : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका (IND vs ENG Test) खेळवली जात आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून युवा खेळाडूंनी या मालिकेत सर्वांचं मन जिंकलंय. अशातच डेब्यू सामन्यातच ध्रुव जुरैल (Dhruv Jurel) टीम इंडियासाठी संकटमोचक म्हणून समोर आला आहे. टीम इंडिया अडचणीत असताना ध्रुवने संयमी 90 धावांची खेळी केली. त्यामुळे सध्या त्याचं कौतूक होताना दिसतंय. अशातच आता अर्धशतक ठोकल्यानंतर ध्रुवने ज्याप्रकारे सेलिब्रेशन त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाचा डाव ढेपाळला. यशस्वी जयस्वालने 73 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर एकही फलंदाज मैदानात टिकला नाही. त्यानंतर ध्रुव जुरैल मैदानात आला अन् एका बाजूने टिकून खेळू लागला. कुलदीप यादवने साथ दिली मात्र, कुलदीप बाद झाल्यावर एकट्या ध्रुवच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी होती. ध्रुवने खऱ्या अर्थाने फलंदाजीची किमया दाखवली अन् आक्रमक फटकेबाजी केली. सहा फोर आणि चार सिक्स मारत ध्रुवने 90 धावा कुटल्या. मात्र, हेटलीच्या बॉलवर ध्रुव बोल्ड झाला.



अर्धशतक पूर्ण झाल्यावर ध्रुवने सॅल्यूट ठोकत जल्लोष केला. ध्रुव जुरलचे वडील नेम चंद हे कारगिल युद्धात सेवानिवृत्त हवालदार आहेत. आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण करताना आपली खेळी वडिलांना समर्पित केली. ध्रुवच्या या संयमी खेळीनंतर कॅप्टन रोहित शर्मासह इतर खेळाडूंनी टाळ्या वाजवत त्याचं कौतूक केलं. एवढंच काय तर अंपायरने देखील ध्रुवसाठी टाळ्या वाजवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.



टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.


इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.