Live सामन्यात Virat Kohli ने केली शिवीगाळ? नेटकऱ्यांनी थेट धारेवर धरलं; पाहा Video
Virat Kohli Viral Video: विराटने उत्साहाच्या नादात सेलिब्रेशन (Virat kohli Celebration) करताना शिवीगाळ (Virat Kohli abuse) केल्याचा आरोप केला जातोय. विराटचं कर्तृत्वासमोर बारीक सारीक चुका दिसून येत नाही, असं म्हणतात. विराटने आजच्या सामन्यात किंग इस अलवेज किंग, हे देखील सिद्ध केलंय.
Virat Kohli, RCB vs PBKS: आयपीएल 2023 चा 27 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings vs Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 24 धावांनी पराभव केलाय. यंदाच्या हंगामातील बंगळुरूचा हा तिसरा विजय ठरलाय. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी सांभाळत होता. त्यामुळे त्याच्या आक्रमकतेची झलक सामन्यात दिसून आली. अशातच विराटचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.
बंगळुरूने पंजाबसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याला प्रत्युत्तर देताना पंजाब किंग्जचा (Punjab Kings) डाव 150 धावांत ऑलआऊट झाला. बंगळुरूकडून सिराजने (Mohammed Siraj) 4 विकेट घेतल्या. सामन्याच्या 6 व्या ओव्हरमध्ये एक प्रकार घडला. पंजाबच्या टीमची विकेट पकडल्यावर उत्साहामध्ये लाईव्ह सामन्यात शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विराटचा हा उत्साहीपणा त्याच्या अंगलट येणार की काय? अशी चर्चा होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
बंगळुरूने दिलेल्या 175 धावांचं आव्हान पार करताना पंजाबची सुरूवात खराब झाली. तीन ओव्हरमध्ये पंजाबच्या 3 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी आणखी एक विकेट आणि आरसीबीची नौका पार होणार होती. अशावेळी विराटने आपल्या विश्वासू सिराजला पुन्हा गोलंदाजीसाठी आणलं. त्यावेळी पंजाबचा हरप्रीत सिंग भाटिया स्ट्राईकवर होता. सिराजने 6 व्या ओव्हरमध्ये पंजाबचा हरप्रीत सिंग भाटियाला रनआऊट केलं. सिराजच्या डायरेक्ट थ्रोमुळे भाटियाला तंबूचा रस्ता पकडावा लागला. त्यावेळी कॅप्टन विराटचा उत्साह गगनात मावेना झाला होता.
पाहा Video
दरम्यान, विराटने उत्साहाच्या नादात सेलिब्रेशन (Virat kohli Celebration) करताना शिवीगाळ केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विराट कोहली पुन्हा आक्रोशाच्या चौकटीत आला आहे. मात्र, विराटचं कर्तृत्वासमोर बारीक सारीक चुका दिसून येत नाही, असं म्हणतात. विराटने आजच्या सामन्यात 57 धावांची मजबूत खेळी केली आणि किंग इस अलवेज किंग, हे देखील सिद्ध केलंय.