India vs Pakistan, World Cup Match Tickets : सर्व क्रिकेट चाहते एशिया कपनंतर वर्ल्ड कपची वाट पाहतायत. येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात आला असून चाहत्यांसाठी ही फार मोठी गोष्ट आहे. अशातच प्रत्येक जण 14 ऑक्टोबरला होणाऱ्या हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्याची वाट पाहतायत. अहमदाबादच्या स्टेडियममध्ये जाऊन प्रत्येकाला हा सामना पहायचा आहे. मात्र पहिल्या राऊंडची तिकीचं काही मिनिटांतच विकली गेली.  


तिकीटांची विक्री झाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपच्या ( World Cup 2023 ) तिकीटांच्या पहिल्या राऊंडमध्ये तासाभरातच तिकीटांची विक्री झाल्याचं समोर आलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलचे टिकीट पार्टनर ‘बुक माय शो’ यांनी तिकीटांची विक्री केली. 


अजूनही मिळणार तिकीट विकत घेण्याची संधी


भारत-पाकिस्तान सामना प्रत्येकाला पाहण्याची इच्छा आहे. जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला तिकीट विकत घेण्याची संधी मिळाली नसेल तर तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्याची तिकीटांच्या विक्रीसाठी अजून एक राऊंड घेण्यात येणार आहे. या तिकीट विक्रीचा दुसरा राऊंड 3 सप्टेंबर रोजी असणार आहे. दरम्यान असा अंदाज लावण्यात येतोय की, या सामन्याची तिकीटं देखील लवकर विकली जातील. 


बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या राऊंडमध्ये केवळ त्याच चाहत्यांना तिकीट विक्री करण्यात आली, ज्यांच्याकडे मास्टरकार्ड आहे. यावेळी एक व्यक्ती केवळ 2 तिकीटं खरेदी करू शकत होता. पहिल्या राऊंडमध्ये तासाभराच्या आत सर्व तिकीटं विकली गेली.


कशी असेल वर्ल्डकपसाठी संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


आशिया कपमध्ये भिडणार भारत-पाक


आजपासून एशिया कपला सुरुवात झाली आहे. 2 सप्टेंबर रोजी या स्पर्धेमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. श्रीलंकेमध्ये हा सामना रंगणार असून चाहत्यांमध्ये याची उत्सुकता आहे.