Rohit Sharma Press Conference: यंदाचा वर्ल्डकप आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. आज वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात वानखेडेमध्ये पहिला सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही टीमच्या कर्णधारांची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी रोहितने सध्या चांगलं क्रिकेट खेळण्यावर फोकस असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं की, प्रत्येक सामन्यात मला दडपण जाणवतं. मात्र तरीही आमचा फोकस चांगला क्रिकेट खेळण्यावर आहे. या टीमधील खेळाडू केवळ वर्तमानात जगतात. खेळाडू आपला खेळ सुधारण्यावर भर देतात. पूर्वी जे घडले ते आता इतिहासजमा झालंय. भूतकाळातील गोष्टींचा फारसा फरक पडत नाही. 


'खेळ सुधारण्यावर आमचा फोकस'


रोहित शर्मा म्हणाला की, खेळाडूंचं लक्ष त्यांच्या खेळात सुधारणा करण्यावर आहे. त्यामुळे पहिल्यांदा जे घडलं ते आता इतिहासजमा झालं आहे. सेमीफायनलच्या सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी पार्टटाइमरची गरज भासणार नाही. 


माझ्याकडे सध्या माझ्या जर्नीचा विचार करायला वेळ नाही. 19 नोव्हेंबरनंतर मी यावर विचार करेन. न्यूझीलंड ही शिस्तप्रिय टीमपैकी एक आहे. न्यूझीलंडचे खेळाडू आमच्या खेळाडूंसोबत भरपूर क्रिकेट खेळलेत. दोन्ही टीमधील खेळाडूंना एकमेकांचे खेळ माहीत आहेत, असंही रोहित शर्माने सांगितलं आहे.


टॉसबाबत काय म्हणाला रोहित शर्मा?


वानखेडेबाबत तो म्हणाला की, मी या ठिकाणी भरपूर क्रिकेट खेळलो आहे. मला वाटतं टॉस हा फार मोठा घटक असणार नाही. गेल्या वर्ल्डकपमधून आम्ही धडा घेतलाय. लीग टप्प्यात आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलोय. 


सेमीफायनलच्या सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज