World Cup 2023: वर्ल्डकप अर्ध्यावर सोडून घरी परतला कर्णधार; आगामी सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह
World Cup 2023: वर्ल्डकपच्या मध्यावरच टीमसाठी एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा कर्णधार अचानक टीम सोडून घरी परतला आहे.
Shakib Al Hasan returned home: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशाच्या टीमची कामगिरी काही फारशी चांगली झालेली नाही. बांगलादेशाचे 5 सामने झाले असून त्यामध्ये केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवणं शक्य झालं आहे. अशातच टीमसाठी एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) मायदेशी परतला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती.
या कारणाने मायदेशी परतला शाकिब
2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेश टीमचा कर्णधार शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) टूर्नामेंटच्या मध्यावर अचानक बांगलादेशात परतला आहे. शाकिब त्यांच्या मेंटॉर नजमुल आबेदीन फहीमसोबत ट्रेनिंहसाठी ढाकामध्ये पोहोचलाय.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये त्याचा मेंटॉर नजमुल आबेदीनसोबत गेला. यावेळी त्याने तीन तास नेट सेशन केलं. शाकिबने खासकरून नेटवर थ्रोडाउनचा सराव केला.
पुढच्या सामन्यासाठी शाकिब असणार का उपलब्ध?
ईएसपीएनशी बोलताना फहीम म्हणाला, "तीन दिवस तो या ठिकाणी सराव करणार आहे. त्यानंतर तो पुन्हा कोलकात्याला परतणार आहे. आम्ही त्याच्या फलंदाजीवर काम केलं. शाकिबला कदाचित अशा प्रकारे काम करणं आरामदायक वाटत असेल. माहित नाही की, आम्ही पुढे काय करणार आहोत. मात्र प्रत्येक सेशन शाकिबच्या म्हणण्यानुसार आम्ही करणार आहोत." शाकिब ( Shakib Al Hasan ) बुधवारी ढाक्याला रवाना झाला होता.
वर्ल्डकपमध्ये शाकिबची कामगिरी निराशाजनक
शाकिब अल हसन सध्याच्या वर्ल्डकपच्या सिझनमध्ये अतिशय खराब फॉर्ममधून जातोय. शाकिबने ( Shakib Al Hasan ) चार इनिंगमध्ये केवळ 56 रन्स केले आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने केवळ सहा विकेट्स घेतल्या आहेत. पॉइंट टेबलमध्येही बांगलादेशची टीम आतापर्यंत खेळलेल्या पाचपैकी चार सामन्यात हरला असून तो नवव्या स्थानावर आहे. टीमचा पुढील सामना 28 ऑक्टोबरला नेदरलँड्स आणि 31 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहेत.