नवी दिल्ली : श्रीलंकेच्या दिलशान मुनावीरने बुधवारी आपल्या डेब्यू मॅचमध्ये शानदार अर्ध शतक पूर्ण केलं. २३ बॉलमध्ये ५३ धावा पूर्ण करून श्रीलंका एकमात्र टी-२० मध्ये १७० रन्सपर्यंत मजल मारता आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उजव्या हाताने खेळणारा हा खेळाडू मात्र आऊट होताना अतिशय विचित्र पद्धतीने आऊट झाला. कुलदीप यादवच्या १२ व्या ओव्हरमध्ये मुनावीराने बॉलला पुल करण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल त्याच्या हातातून सुटला आणि टच  निघून गेला. २८ वर्षाच्या मुनावीराने कुलदीप यादवच्या बॉलला पूर्ण ताकदीने हिट करण्याचा प्रयत्न केला. नशिब तो बॉल कुणा प्लेअरला लागला नाही. बॉल ऑफ स्टंपच्या टॉपला टच होऊन निघून गेला आणि मुनावीरा आऊट झाला. पण ही विकेट इतकी वेगळी होती की सुरूवातीला नेमकं काय घडलं हे कुणाला कळलंच नाही. मुनावीराने इतक्या जोरात बॅट फिरवली की त्याच्या हातून ती बॅट उडाली आणि समोर जाऊन पडली. नशीब त्यावेळी समोर कुणी उभं नव्हतं. अन्यथा ती बॅट नक्कीच कुणाला तरी लागली असती. 


भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात जिंकून निघाली आहे. टेस्ट आणि वनडेमध्ये श्रीलंकेचे सूपडा साफ केल्यानंतर बुधवारी टी २० सामन्यात मात्र खेळ वेगळा होता. श्रीलंकेने पहिल्यांदा टीम इंडियासमोर १७१ धावांचे लक्ष ठेवले होते. कॅप्टन विराट कोहलीने ८२ तर मनीष पांडेने नाबाद ५१ धावा करून तीन विकेट गमावून विजय मिळवला. 



कोहलीचा हा टी २० मधील हा ५० वा सामना होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ३ टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये ३-० ने विजय मिळवला आहे. पाचव्या वन डे सामन्याच्या सिरीजमध्ये ५-० असा विजय मिळवला आहे.