ज्यांनी दिनेश कार्तिकचा ऐतिहासिक षटकार नाही पाहिला...त्यांनी पाहा हा VIDEO
निदहास ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात दिनेश कार्तिकने लगावलेल्या षटकाराच्या जोरावर भारताने चार विकेट राखून विजय मिळवला आणि जेतेपद उंचावले.
कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात दिनेश कार्तिकने लगावलेल्या षटकाराच्या जोरावर भारताने चार विकेट राखून विजय मिळवला आणि जेतेपद उंचावले.
दिनेश कार्तिने ८ चेंडूत २९ धावांची तुफान खेळी केली. खरंतर संपूर्ण संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली मात्र सामन्याचा खरा हिरो ठरला दिनेश कार्तिक.
कार्तिकच्या तुफान खेळीमध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. ज्यावेळी कार्तिक फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची स्थिती काही चांगली नव्हती. मात्र कार्तिकने संयमी फलंदाजी करताना विजयश्री खेचून आणली.
शेवटच्या दोन ओव्हरमध्ये हवे होते ३४ रन्स
भारतासमोर विजयासाठी बांगलादेशने १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी ३४ रन्स हवे होते. यावेळी कार्तिकने (८ बॉलमध्ये २९ रन्स) क्रीझवर पाय ठेवला. त्याने रुबेल हुसैनच्या १९व्या ओव्हरमध्ये दोन फोर आणि दोन सिक्स लगावत २२ रन्स केले. शेवटच्या ६ बॉलमध्ये भारताला १२ रन्स हवेत होते. यावेळी विजय शंकर पहिल्या बॉलवर आऊट झाला. त्यानंतर एका बॉलमध्ये भारताला जिंकण्यासाठी ५ रन्स हवे असताना कार्तिकने सौम्या सरकारच्या बॉलवर सिक्सर खेचत विजय मिळवला. भारताचा टी-२०मध्ये बांगलादेशवर हा सलग आठवा विजय आहे.
शेवटच्या चेंडूत हव्या होत्या ५ धावा
भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होता. यावेळी कार्तिकने मिडविकेटच्या वरुन षटकार खेचत भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. भारताला हा सामना जिंकून देण्याचे श्रेय केवळ कार्तिकला जाते.