नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 नंतर निवृत्त झालेल्या आशिष नेहरानं महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत मत व्यक्त केलं आहे. राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20नंतर धोनीवर टीकेची झोड उठली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बड्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोहली मोठे शॉट्स मारत होता पण धोनी मात्र जलद रन्स बनवता आल्या नाहीत. यानंतर लक्ष्मण आणि आगरकरनं धोनीच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले. तर सेहवाग आणि गावस्कर यांनी मात्र धोनीची पाठराखण केली.


या वादावर आता आशिष नेहरानं भाष्य केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंतला संधी देण्याची मागणी आशिष नेहरानं केली आहे. पण निवड समितीनं धोनीला विश्रांतीची गरज आहे का याचा निर्णय त्याला स्वत:लाच घेऊन द्यावा, असंही नेहरा म्हणालाय.


धोनीला पर्याय शोधा- गांगुली


टी-20मध्ये धोनी चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला पर्याय शोधण्याबाबत विचार करायला हवा, असं गांगुली म्हणाला आहे. धोनीच्या टीममधील भूमिकेबाबत टीम मॅनेजमेंटनं बोलण्याची आता वेळ आली आहे. धोनी टी-20मध्ये आला तेव्हा मोठं नाव होतं. त्यामुळे धोनीला स्वत:ला सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे, असं गांगुली एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणलाय.


टीम मॅनेजमेंटनं २०१९च्या वर्ल्ड कपवरही लक्ष दिलं पाहिजे. जर धोनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली नाही तर पर्यायाबाबत विचार करावा लागेल, असं वक्तव्य गांगुलीनं केलंय.


धोनीला खाली बॅटिंगला पाठवण्यापेक्षा ४ नंबरवर बॅटिंगला पाठवण्यात यावं, अशी मागणी गांगुलीनं केली आहे. धोनीला ४ नंबरवर बॅटिंगला पाठवलं तर त्याला सेट व्हायला वेळ मिळेल आणि मग त्याला आक्रमक खेळ करता येईल, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली आहे.


कोहलीनं केलेल्या धोनीच्या समर्थनाबद्दलही गांगुलीनं भाष्य केलं आहे. कर्णधारानं दाखवलेल्या भरवशाचा फायदा खेळाडूला कामगिरी उंचावण्यासाठी होतो, असं गांगुली म्हणाला.