Mallika Sagar: शांत, स्पष्ट आणि सुंदर; WPL च्या ऑक्शनरवर Dinesh Karthik झाला फिदा, पाहा काय म्हणतोय...
WPL Auction 2023: मल्लिकाने महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये आपले काम चोख बजावलं होतं. मल्लिकाचा हाच अंदाज क्रिकेटर दिनेश कार्तिकला भावला. त्यावर डीके म्हणतो...
WPL 2023 Auction: मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Centre) महिला प्रीमियर लीग (WPL 2023) चा लिलाव पार पडला. स्पर्धेसाठी एकूण 448 महिला खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्यापैकी एकूण 92 खेळाडूंना बोली लागवण्यात आली. लिलावात (WPL Auction 2023) अनेक दिग्गज महिला खेळाडूंवर बोली लावण्यात आली. मात्र, चर्चात झाली ती कोणा एका खेळाडू नव्हे तर WPL च्या ऑक्शनरची...
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) संघाने लिलावात सर्वाधिक बोली लावून स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) संघात सामील करून घेतलं. मल्लिका सागर (Mallika Sagar) हिने या लिलावात ऑक्शनिंग केली होती. मल्लिकाने महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये आपले काम चोख बजावलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) तिच्यावर फिदा झाल्याचं पहायला मिळालं आहे.
दिनेश कार्तिक याने ट्विट (Dinesh Karthik Tweet) करत मल्लिका सागर हिचं कौतूक केलंय. मल्लिकाने स्पष्ट आणि अत्यंत संतुलित ऑक्शनिंग केल्याचं डीकेने (DK) म्हटलं आहे.
आणखी वाचा - जिथं विषय गंभीर... तिथं 'अंबानी' खंबीर, BCCI चं टेन्शन संपलं, IPL होणारच!
काय म्हणाला Dinesh Karthik ?
आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी, स्पष्ट आणि अत्यंत संतुलित... महिला प्रीमियर लीगच्या लिलाव सोहळ्या तिला लिलावकर्त्याची भूमिका पार पाडायला दिल्याबद्दल बीसीसीआयचे खूप खूप अभिनंदन..., असं दिनेश कार्तिक (Dinesh Karthik On Mallika Sagar) मल्लिकाचं प्रशंसा करताना म्हणालाय.
पाहा ट्विट -
दरम्यान, फक्त WPL नव्हे तर मल्लिकाने प्रो-कबड्डी लीगमधील खेळाडूंचा लिलाव केला होता. मल्लिका या सेंटर फॉर मॉडर्न अँड कंटेम्पररी आर्टच्या (Center for Modern and Contemporary Art) सल्लागारपदी कार्यतर आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी लिलावकर्ते म्हणून ह्यू एडमीड्स (Hugh Admeads) यांनी चोख काम केलं होतं. त्यानंतर आता मल्लिका सागरची चर्चा होताना दिसते.