IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची बॅट चांगलीच कामगिरी करत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांमध्ये तो (Dinesh Kartik) फक्त एकदाच बाद झाला असून त्याने 200 धावा केल्या आहेत. तो आरसीबीसाठी एकामागून एक मॅचविनिंग इनिंग खेळत आहे. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अडचणी वाढत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला आयपीएल 2022 नंतर आशिया चषक (Asia Cup) आणि T20 विश्वचषक (T20 World Cup) यांसारख्या स्पर्धा खेळायच्या आहेत आणि जर ऋषभ पंत या टूर्नामेंटपूर्वी लयमध्ये परत येऊ शकला नाही, तर दिनेश कार्तिक टीम इंडियामध्ये परत येऊ शकतो.


IPL 2022 च्या 6 डावांमध्ये, दिनेश कार्तिकने खालच्या क्रमाने फलंदाजी करताना RCBसाठी 6 डावात 197 च्या सरासरीने 197 धावा केल्या. त्याचा स्ट्राइकरेट 210 आहे, तर त्याच्या बॅटने 18 चौकार आणि 14 षटकार मारले आहेत. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 5 डावात 36 च्या सरासरीने 144 धावा करू शकला आहे आणि त्याचा स्ट्राइकरेट 147 आहे. त्याने आतापर्यंत 15 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत.


विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर, दिनेश कार्तिकला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही, तर यष्टीरक्षक एमएस धोनीनेही निवृत्ती घेतली आहे. अशा स्थितीत ऋषभ पंत हा यष्टीरक्षक फलंदाजांची पहिली पसंती आहे, पण दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 च्या आतापर्यंतच्या कामगिरीने ऋषभ पंतची झोप उडवली असेल. पंतने लवकर मोठी खेळी केली नाही तर त्याच्यावर नक्कीच दडपण असेल.