विम्बल्डन : तीन वेळा विम्बलडनच्या पुरुष एकेरीचा किताब मिळवणाऱ्या सर्बियाच्य़ा नोव्हाक ज्योकोविचला दुखापत झाल्यानं उप-उपांत्य फेरीचा सामना सोडून स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री झालेल्या सामन्यात झेक गणराज्याच्या टॉमस बर्डिचसमोर खेळताना ज्योकोविच्या खांद्याला दुखापत झाली.  दुखापत झाली त्यावेळी ज्योकोविच 7-6 ,2-0 असा पिछाडीवर होता. 


जॉकोविचच्या एक्झिटमुळे टॉमस बर्डिच उपांत्य फेरीत दाखल झालाय. आता बर्डिच आणि रॉजर फेडरर यांच्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 


विम्बल्डनमधून दिग्गजांची एक्झिट सुरुच आहे. गतविजेता आणि वर्ल्ड नंबर वन अँडी मरेला विम्बल्डनमध्ये पराभवाचा धक्का बसलाय. 24व्या मानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीनं मरेवर सनसनाटी विजय मिळवलाय.  


3-6, 6-4, 6-7, (4-7), 6-1, 6-1, अशा सेटमध्ये क्वेरीनं मरेवर विजय मिळवला. 2009साली अँडी रॉडिकनंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या टेनिसस्टारनं विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. 


दुसरीकडे या पराभवामुळे अँडी मरेच्या रँकिंगवर परिणाम होणार असून नोवाक ज्योकोविच त्याचं स्थान घेण्याची शक्यता आहे.