न्यूयॉर्क : ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमने अखेर पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. जर्मनीच्या अलेक्झांडर झेवरेव्हला अमेरिकन ओपन टेनिसच्या अंतिम सामन्यात २- ६,  ४- ६,  ६-४, ६-३, ७-६(६) अशा सेटमध्ये पराभूत  केले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यंत चुसशीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित थिेमने पाचव्या मानांकित अलेक्झांडर या धुव्वा उडवला. चार तास दोन मिनिटे ही झुंज रंगली. पहिले दोन सेट्स गमविल्यानंतरही जेतेपद पटकावणारा या स्पर्धेतील थिएम पहिला खेळाडू ठरला आहे. पहिल्या तीन ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पराभूत झालेल्या २७ वर्षीय थिमने यांने दोन सेट गमावल्यानंतर आपली सुवर्णसंधी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले.


अंतिम सामन्यात पाचवा सेट टायब्रेकरमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज खरेतर आम्ही दोघेी विजेत आहोत, असे मला वाटते. कारण आम्ही दोघांनीही चांगला खेळ केला. जेतेपदाच्या योग्यतेचा खेळ होता, अशी प्रतिक्रिया विजेतेपद पटकाविल्यानंतर थिएमने व्यक्त केली.


२०१४ मध्ये क्रोएशियाचा मारिन सिलकनंतर नवा ग्रँडस्लॅम विजेता होण्याचा मान थिएमने पटकावला आहे. तो पहिला खेळाडू आहे. तसेच फेडरर, नदाल, जोकोविच यांच्याव्यतिरिक्त ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाराही थिएम हा वावरिंकानंतरचा पहिला खेडाळू ठरला आहे. २०१६ मध्ये वावरिंकाने जेतेपद पटकावले होते.


अंतिम सामन्यात व्हेरेव्हने १५ बिनतोड सर्व्हिस केल्या तर थिएमने केवळ दोन आणि  व्हेरेव्हने १५ आणि थिएमने केवळ ८ दुहेरी चुका केल्या. कोरोनामुळे या स्पर्धेत प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नव्हती. काही मोजकेच लोक उपस्थित होते. यात पदाधिकारी, पत्रकार आणि स्टाफ सदस्य होते.