मी परतीचे दोर कापलेत..! सुनील नारायण टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही? स्पष्टच म्हणाला...
Sunil Narine On T20 World Cup : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज सुनील नारायण याने आगामी टी-20 वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पोस्ट करत त्याने माहिती दिली.
Sunil Narine Rules Out T20 World Cup : कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार सलामीवीर फलंदाज सुनील नारायण (Sunil Narine) याने यंदाच्या आयपीएलमध्ये कहर केला आहे. आपल्या आक्रमक खेळीमुळे सुनील नारायणने खणखणीत शतक ठोकलं होतं. तर त्याने आत्तापर्यंत 7 सामन्यात 286 धावा कुटल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुनील नारायणला पुन्हा वेस्ट इंडिज टीमधून खेळवण्यासाठी आम्ही इच्छूक असल्याचं वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोमन पॉवेल याने म्हटलं होतं. त्यावर आता सुनील नारायण याने पोस्ट करत आपण टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) खेळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सोशल मीडियावर पोस्ट करत सुनील नारायणने स्पष्टीकरण देखील दिलंय.
काय म्हणाला सुनील नारायण?
मी आनंदी आहे आणि मी कृतज्ञ आहे की, माझा फॉर्म पाहता काही खेळाडूंना मी निवृत्तीतून बाहेर पडून जूनमध्ये आयोजित होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळावं असं वाटतंय. पण मला वाटतंय की, मी निवृत्तीचा निर्णय शांततेसाठी घेतला होता आणि आता मी परतीचे दोर कापले आहेत. राष्ट्रीय संघात परतण्याचे माझे दरवाजे बंद झाले आहेत. टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून खेळणाऱ्या खेळाडूंना मी पाठिंबा देईन ज्यांनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून मेहनत घेतली आहे. हे खेळाडू आणखी एक टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यास पात्र आहेत आणि मी संघाला त्यासाठी शुभेच्छा देतो, असं सुनील नारायणने म्हटलं आहे.
रोमन पॉवेलने काय म्हटलं होतं?
मी गेल्या वर्षभरापासून त्याच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपबाबतची गोष्ट डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याने त्या सर्व खेळाडूंनी ब्लॉक केलंय, ज्यांनी त्याला वेस्ट इंडिजसाठी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्याचा प्रयत्न केलाय. ज्यामुळे कायरन पोलार्ड. ड्वेन ब्रावो आणि निकोलस पुरन देखील आहे, असा खुलासा रोमन पॉवेलने केला होता. सुनीलने या हंगामात नाइट रायडर्ससाठी अव्वल स्थानावर चांगली कामगिरी करतोय. त्याला आम्ही टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवण्याचा प्रयत्न करतोय, असं रोमन पॉवेलने म्हटलं होतं.