मुंबई : आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर आता भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका (Ind vs SA T20) खेळायची आहे आणि ती सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने संघातील अनेक महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-20 सामना भारताने जिंकला तर हा भारताचा सलग 13वा विजय असेल. याबाबत द्रविड म्हणाला की, मी या विक्रमाचा फारसा विचार करत नाही. आपण चांगले खेळलो तर जिंकू, पण चांगले खेळलो नाही तर शिकू. 


दिनेश कार्तिकच्या भूमिकेबद्दलही खुलासा


दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय टी-20 संघात त्याला स्थान मिळालं. पण संघात त्याची भूमिका काय असेल याबाबत ही द्रविडने खुलासा केलाय. 


राहुल द्रविडने कार्तिकबद्दल बोलताना म्हटले की, 'तो ज्या प्रकारे आयपीएलमध्ये त्याच्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत होता, तीच भूमिका त्याला भारतासाठी निभावायची आहे आणि हे पूर्णपणे स्पष्ट आहे. फिनिशरची भूमिका बजावण्यासाठीच त्याची संघात निवड करण्यात आली आहे.' (Rahul dravid on Dinesh Kartik)


द्रविडने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल बोलताना म्हटले की, 'तो सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी प्रत्येकजण उपलब्ध असेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. हिटमॅन पूर्णपणे तंदुरुस्त आणि फ्रेश असावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे अशी वेळ येईल जेव्हा आम्ही आमच्या मुख्य खेळाडूंना विश्रांती देतो.  (Rahul Dravid on Rohit Sharma)


हार्दिक पांड्याबाबत द्रविड म्हणाला की त्याने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावे अशी आमची इच्छा आहे.' (Rahul Dravid on Hardik pandya)