T20 World Cup 2024: आयपीएलनंतर आता टीम इंडिया वर्ल्डकपच्या तयारीकडे वळली आहे. 5 तारखेपासून भारतासाठी या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी T20 वर्ल्डकपमध्ये 20 टीम सहभागी होत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये असे अनेक नियम वापरले गेले आहेत, जे टी-20 वर्ल्ड कपमध्ये लागू होणार नाहीत. असे कोणते नियम आहेत, ते पाहूया.


इम्पॅक्ट प्लेअर नियम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना, कर्णधाराला आणखी पाच खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या 5 खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करायचा असतो. सामन्याच्या मध्ये कोणत्याही टीमचा कर्णधार एखाद्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकतो आणि इम्पॅक्ट पर्यायासाठी दिलेल्या नावांमधून एका खेळाडूची निवड करू शकतो. आयपीएल 2024 मध्ये सर्व टीमनी या नियमाचा फायदा घेतला आहे. 


आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे टीम्सने भरपूर रन्स केलेत. यामुळे, टीमनी बहुतेक वेळा अतिरिक्त फलंदाज खेळवले. पण T20 वर्ल्डकपमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम नसणार आहे. अशा परिस्थितीत नेमका काय बदल होतो हे पहावं लागणार आहे.


नो बॉल आणि वाईड बॉलसाठी DRS नाही


आयपीएलमध्ये खेळाडू सामन्यावेळी वाईड बॉल आणि नो बॉलसाठी डीआरएस घेऊ शकण्याचा पर्याय होता. पण टी-20 वर्ल्डकपमध्ये असं होणार नाहीये. त्या खेळाडूंना वाईड आणि नो बॉलसाठी डीआरएस घेता येणार नाही.


गोलंदाज टाकू शकणार केवळ एक बाऊंसर


आयपीएल सामन्यांमध्ये कोणताही गोलंदाज एका ओव्हरमध्ये दोन बाऊन्सर टाकू शकत होता. मात्र टी-20 वर्ल्ड कपमध्ये असं दिसून येणार नहाी. T20 वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये गोलंदाज एका ओव्हरमध्ये एकच बाऊन्सर टाकू शकणार आहे.


स्ट्रॅटेजिक टाईम आऊट नसणार


आयपीएलमध्ये, एका डावात प्रत्येकी 2.30 मिनिटांचा दोन वेळा स्ट्रॅटेजिक टाईम आऊट देण्यात येतो. त्यानुसार, पूर्ण सामन्यादरम्यान एकूण 4 स्ट्रॅटेजिक टाईम आऊट देण्यात येत होते. T-20 वर्ल्डकप दरम्यान कोणताही स्ट्रॅटेजिक टाईम आऊट दिला जाणार नाही. यामध्ये फक्त ड्रिंक्स ब्रेकला वेळ देण्यात येईल.