AUS vs PAK: 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला होता. बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. मात्र या सामन्यादरम्यान नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं. बेंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात एका चाहत्याने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पाकिस्तानी चाहत्यांना पाक टीमला सपोर्ट करण्यापासून रोखण्यात आलं. स्टेडियममध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी पाकिस्तानी चाहत्यांना स्पष्टपणं सांगितलं की, स्टेडियममध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत. यावरून स्टेडियममध्ये गोंधळ तर झालाच पण आता सोशल मीडियावरही गदारोळ सुरू आहे.


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानची जर्सी घातलेला एक व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याशी वाद घालताना दिसतोय. यामध्ये तो चाहता म्हणाला, 'मी पाकिस्तानचा आहे. मी 'पाकिस्तान झिंदाबाद' नाही म्हणणार तर काय बोलणार?' 


या व्हिडीओमध्ये हा चाहता पुढे म्हणतो की, ज्यावेळी लोक 'भारत



माता की जय'च्या घोषणा देतात, तर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा का देऊ शकत नाहीत. 


 


सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच पाकिस्तानी क्रिकेट चाहते संतापले दिसून आले. भारतातील पाकिस्तानी चाहत्यांना त्यांच्याच टीमना सपोर्ट करता येत नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. काही भारतीय क्रिकेट चाहतेही पोलिसांची ही वृत्ती चुकीची असल्याचं म्हणतायत. अशा परिस्थितीत बंगळूरूच्या स्टेडियममध्ये झालेला हा प्रकार नक्कीच मोठ्या वादाचे कारण बनू शकतो.


ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात


पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 367 रन्सचा डोंगर रचला. वॉर्नर आणि मार्शने पहिल्या विकेटसाठी 259 धावांची पार्टनरशिप करत विक्रम केला. याला उत्तर देताना पाकिस्तानची टीम 305 रन्सवर ऑलआऊट झाली. डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक163 रन्स केले. यामध्ये त्याने 9 सिक्स आणि 14 चौकारांची आतषबाजी केली. मिचेल मार्शने 9 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 121 धावा फटकावल्या. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला 9 विकेट गमावत 367 रन्स करता आले. 


दुसरीकडे पाकिस्तानतर्फे अब्दुल्ला शफीक 64 तर इमाम उल हकने 70 रन्स केल्या. कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. बाबर 18 धावा करुन बाद झाला. अखेरील 62 रन्सने पाकिस्तानचा पराभव आहे.