ऑल्मिपिकमध्ये सहभागी होणं हा सर्वच ऍथलीटचं स्वप्न असतं. यामध्ये विजय मिळालाच तर त्याचा आनंद गगनात मावत नाहीत. ऑल्मिपिकमध्ये जगभरातून अनेक खेळाडू स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रत्येकाची गोष्ट निराळी आहे. असं असताना एका 7 महिन्याच्या गर्भवती ऍथलीटने या ऑल्मिपिकमध्ये सहभाग घेतला होता. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इजिप्तची फेंसर (तलवारबाज) नादा हफीजने ऑल्मिपिकमध्ये सहभाग घेतल्यानंतर सांगितलं की, ती 7 महिन्यांची गर्भवती आहे. तरीही तिने यामध्ये सहभाग घेतला होता. एवढंच नव्हे तर वर्ल्ड कप 10 एलिझाबेथ टार्टकोवस्कीच्या विरुद्ध तिने विजय देखील मिळवला. हाफीजने महिलांच्या वैयक्तिक तलवारबाजीमध्ये टार्टाकोव्स्कीविरुद्ध 15-13 अशा फरकाने पहिली चढाओढ जिंकली. मात्र, तिला राऊंड ऑफ 16 मध्ये दक्षिण कोरियाच्या जिओन ह्योंगविरुद्ध पराभव पत्करावा लागला.


ऑल्मिपिकमधून बाहेर पडल्यावर केला खुलासा 


29 जुलै रोजी हाफिजने तिच्या गरोदरपणाची बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. खुलासा झाल्यापासून, हाफिजची तलवारबाजीबद्दलची आवड आणि समर्पणाबद्दल खूप प्रशंसा होत आहे. हायोंगविरुद्धच्या सामन्यातही हाफिजने शानदार खेळ केला.



हफीजचा तिसऱ्यांदा सहभाग 


हाफिजने पुढे लिहिले की, "गर्भधारणा स्वतःच कठीण असते, परंतु जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्यासाठी लढणे खूप कठीण होते. माझे पती इब्राहिम इहाब आणि माझ्या कुटुंबाच्या विश्वासाने मला इथपर्यंत पोहोचता आले हे माझे भाग्य आहे. हे खास ऑलिम्पिक वेगळे होते. तीन वेळा ऑलिम्पियन पण यावेळी तरुण ऑलिम्पियनसोबत.'' हाफिजने पॅरिस मोहिमेपूर्वी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक आणि २०२१ टोकियो ऑलिम्पिकमध्ये इजिप्तचे प्रतिनिधित्व केले होते.