लंडन : दक्षिण आशियामधला क्रिकेटचा इतिहास १०० वर्ष जुना आहे. पण इंग्लंडमध्ये एक अशा क्रिकेटपटू आहेत ज्यांचं वय या क्रिकेट इतिहासापेक्षा जास्त आहे. ३० ऑक्टोबरला लंडनमध्ये जन्मलेल्या एलीन वेलान यांचा वाढदिवस होता. एलीन वेलान या १०७ वर्षांच्या झाल्या आहेत. एलीन यांनी दुसऱ्या महायुद्धाआधी आणि नंतरही क्रिकेट खेळलं आहे. एलीन वेलान यांनी १९३७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इंग्लडकडून खेळण्याबरोबरच त्यांनी मिडलसेक्स, सिव्हील सर्व्हिसकडूनही क्रिकेट खेळलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीनं नुकताच त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये वेलान इंग्लंडची सध्याच्या महिला टीमच्या कर्णधारासोबत योगा करताना दिसत आहे. वय १०७ असूनही एलीन पूर्णपणे फिट दिसत आहे. २०११ साली वयाची १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या एलीन या पहिला महिला टेस्ट क्रिकेटपटू बनल्या. योगा आणि सकस आहार हेच माझ्या आयुष्याचं गुपित आहे, असं एलीन सांगतात.



२०१७ सालच्या आयसीसी महिला वर्ल्ड कपदरम्यान एलीन वेलान इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानात उपस्थित होत्या. भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या फायनलआधी एलान यांनी बेल वाजवली होती.



एलीन वेलान यांनी ७ टेस्ट मॅचमध्ये फक्त ३८ रनच केल्या होत्या. पण या मॅचमध्ये त्यांनी फक्त २.३२ रन प्रती ओव्हर देऊन १० विकेट घेतल्या होत्या. एलीन वेलान यांनी त्यांची शेवटची टेस्ट मॅच १९४९ साली न्यूझीलंडविरुद्ध खेळली.