PAK vs ENG T20 World Cup:टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनल सामना (Pak vs Eng Final) आता रंगदार स्थितीत पोहोचला आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या इंग्लंडची सुरूवात चांगली राहिली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी वेळोवेळी पाकिस्तानच्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर आता इंग्लंडला वर्ल्ड कप  जिंकण्यासाठी फक्त 138 धावांची गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. षटकार खेचणारा मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) लवकर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद हॅरिस देखील 8 धावा करत बाद झाला. त्यानंतर कॅप्टन बाबरने (babar azam) जबाबदारी घेतली. त्याला मसूदने देखील मोलाची साथ दिली.


मात्र, आदिल रशिदने (adil rashid) कॅप्टन बाबरला तंबूत पाठवलं आणि पाकिस्तानच्या आशा मावळल्या. त्यानंतर बटलरने (jos buttler) पेस बॉलरला आणलं आणि पाकिस्तानची टीम पत्त्यासारखी कोसळली आणि पाकिस्ताने 137 धावा केल्या


दरम्यान, वर्ल्ड कप ( T20 World Cup Final) जिंकण्यासाठी इंग्लंडला फक्त 138 धावांची गरज आहे. त्यानंतर 138 पाठलाग करताना इंग्लंडला पहिला झटका बसला आहे. अॅलेक्स हेल्स 1 धाव करत बाद झालाय.