मुंबई : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने पाचवा कसोटी सामना गमावला. त्यानंतर 3 टी 20 सामन्यांची सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिला सामना नुकताच झाला. या सामन्यात हार्दिक पांड्या रिअल हिरो बनला. त्याने विजय खेचून आणला असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 50 धावांनी विजय झाला आहे. या मॅचदरम्याच भुवनेश्वर कुमारचा व्हिडीओ सोशल मीडियावर खास चर्चेचा विषय ठरत आहे. भुवीने इंग्लंडच्या कर्णधाराला पहिल्याच ओव्हरमध्ये तंबुत धाडलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भुवीचं क्रिकेटप्रेमींनी खूप कौतुकही केलं.


टीम इंडियाने या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. भुवनेश्वर कुमारने पहिली ओव्हर टाकली. ओपनर जेसन रॉय पहिल्या 3 बॉलवर एकही रन काढू शकला नाही. चौथ्या बॉलवर एक रन काढला. जोस बटलर पाचव्या बॉलवर खेळण्यासाठी तयार होता मात्र भुवीने चकवा देत त्याची विकेट काढली. 


जोस बटलरला शून्यवर तंबुत परतावं लागलं. हे टीम इंडियासाठी मोठं यश होतं. बटलरची बॅट चालली असती तर टीम इंडियासाठी ते धोक्याचं होतं. पावर प्लेमध्ये भुवीने जबरदस्त कामगिरी केली. 3 ओव्हरमध्ये इंग्लंडला फक्त 10 धावा दिल्या. 


तर एकूण पहिल्या 6 ओव्हरमध्ये 32 धावा काढण्यात इंग्लंडला यश मिळालं. तर टीम इंडियाने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 60 धावा काढल्या होत्या. भुवीने केलेल्या कामगिरीचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात भुवीचंही मोठं योगदान आहे.