मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील 2 स्टार खेळाडूंना दुखापत झाली आहे. फलंदाज केन विल्यमसन आणि स्पिनरला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स मैदानात सामना सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरुद्ध सीरिज दरम्यान स्टार फलंदाजन केन विल्यमसनला दुखापत झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डनं याबाबत माहिती दिली आहे. तर स्पिनर मिचेल सँटनरला देखील बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळए मिचेल दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. इंग्लंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना 11 जून पासून बर्मिंघम इथे होणार आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. 


इंग्लंड विरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने खेळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण विश्वचषक मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी तयारी करण्याची ही शेवटची संधी आहे. इंग्लंडमधील विल्यमसनची कामगिरी खूपच खराब आहे. जर तो दुसर्‍या कसोटीत खेळत असेल आणि मोठ्या स्कोअरमध्ये पोहोचला तर त्याचा आत्मविश्वास वाढेल. 


लॉर्ड्स झालेल्या कसोटीच्या पहिल्या डावात विल्यमसन 13 धावांवर बाद झाला तर दुसऱ्या डावात फक्त 1 धाव काढली. विल्यमसनला अँडरसन आणि ऑली रॉबिन्सनने तंबुत पाठवून दिलं. स्पिनर मिचेलऐवजी आता एजाज पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ऐजाजने 8 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये 22 विकेट्स आपल्या नावावर करून घेतल्या आहेत.