सामन्यादरम्यान चाहत्याची विचित्र गोष्ट कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चाहत्याने नेमकं काय केलं पाहा व्हिडीओ
मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंडचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे. हा सामना ड्युक बॉलनं खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड 2 कसोटी मालिकांची सीरिज खेळवली जात आहे. लॉर्ड्स मैदानावर हा सामना सुरू आहे. या सीरिजमधील पहिला सामना ड्रॉ झाला. या सामन्यादरम्यान अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. मात्र एक अजब प्रकार घडला आणि तो कॅमेऱ्यात कैद देखील झाला.
स्टेडियममध्ये नेमकं काय घडलं?
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना सुरू असताना स्टेडियममध्ये बसलेल्या एक चाहत्याने विचित्र हालचाली करायला सुरुवात केली. त्याच्या या हालचाली पाहून सर्वांनाच हसू आलं. या चाहत्याने रेनकॉट घालण्याचा प्रयत्न करताना विचित्र चाळे केले तसच तो पुन्हा काढून पुन्हा अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
चाहत्याच्या या विचित्र हालचालींनी त्यानं सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. त्याला रेनकोट घालायला जमला पण त्याने तो उलटा घातला. त्याचा हा संपूर्ण प्रकार पाहून सर्वांना हसू आलं आणि ही दृश्यं सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली.
त्याचे हे विचित्र चाळे पाहून स्टेडियममध्ये बसलेल्या इतर नागरिकांना खूप जास्त हसू येत होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सीरिज दरम्यान डेवॉन कॉनवेनं द्विशतक झळकवलं आहे. या सीरिजनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड 18 ते 22 जून दरम्यान WTC2021चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सामना खेळला जाणार आहे.