मुंबई: वाढदिवशी आपलं स्वप्न पूर्ण व्हावं तसं क्रिकेटपटूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची संधी तर मिळाली. मात्र नशिबानं त्या दिवशी साथ दिली नाही. क्रिकेटपटूच्या वाट्याला मोठं दु:ख आलं आणि आनंदावर विरजण पडलं. त्यामुळे सर्वांचीच मोठी निराशा झाली. क्रिकेटच्या मैदानात ही घटना घडल्यानंतर चाहतेही हिसमूसल्याचं पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सीरिजमधील पहिला वन डे सामना खेळण्यात आला. चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाईड ग्राऊंडवर इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दरम्यानच्या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीसाठी अष्टपैलू चारिथ असालंका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यूची संधी मिळाली. त्याच्याशिवाय अन्य 2 खेळाडूंनीही एकदिवसीय सामन्यात डेब्यू केलं.



इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी केली. श्रीलंका संघाची पहिली विकेट अवघ्या 23 धावांनी गडगडली. त्यानंतर चारिथ असालंका तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. 6 चेंडूत एकही रन करू शकला नाही. डेव्हिड विलेने त्याला जो रूटच्या हातून कॅच आऊट केलं. डेब्यू करताच एकही रन न काढता आऊट झाल्यानं चाहत्यांची मोठी निराशा झाली.