नवी दिल्ली: कोरोना काळात क्रिकेट सामन्याआधी किंवा नंतर बायो बबलचं उल्लंघन काही खेळाडू करताना समोर आलं आहे. पाकिस्तानी लीग दरम्यान खेळाडूंनी बायो बबलचं उल्लंघन केल्याची घटना नुकतीच ताजी आहे. तर इंग्लंड दौऱ्यावर असताना श्रीलंकेच्या खेळाडूनं बायो बबलचं उल्लंघन केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचे दोन स्टार क्रिकेटर निरोशन डिकवेला आणि कुशल मेंडिस बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन करताना समोर आले. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या स्टार क्रिकेटरच्या हातात नशेची वस्तू असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये काही कुशल मेंडिसच्या हातात सिगारेट सारखं काहीतरी दिसत आहे. त्याच्या हातातली गोष्टी निरोशन काढून स्वत: घेण्याचा प्रयत्न करत होता. 





हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांविरोधात चौकशीसाठी बैठक बोलवण्यात आली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अशा लोकांना खेळायला देऊ नका पुन्हा बोलवून घ्या अशी संतप्त प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.


श्रीलंकेनं टी 20 मालिका 0-3 ने शनिवारी गमावली. ऑक्टोबर 2020 नंतर त्याला सलग पाचव्या टी -20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंका आता इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचा पहिला सामना 29 जून रोजी चेस्टरली स्ट्रीट येथे खेळला जाईल.