साऊथॅम्पटन : भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा २४६ रनवर ऑल आऊट झाला आहे. सॅम कुरननं केलेल्या संघर्षामुळे इंग्लंडला एवढी मजल मारता आली. इंग्लंडची एकवेळची अवस्था ८६-६ अशी झाली होती. पण कुरन आणि मोईन अलीनं इंग्लंडच्या इनिंगला आकार दिला. सॅम कुरन १३६ बॉलमध्ये ७८ रन करून सगळ्यात शेवटी आऊट झाला. तर मोईन अलीनं ८५ बॉलमध्ये ४० रन केले. भारताकडून जसप्रीत बुमराहनं ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि आर.अश्विनला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्याला १ विकेट घेण्यात यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलट आला होता. अखेर कुरन आणि मोईन अलीनं इंग्लंडची पडझड थांबवली.


५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधल्या सुरुवातीच्या २ टेस्ट भारतानं गमावल्या होत्या. तर तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा शानदार विजय झाला होता. या सीरिजमध्ये इंग्लंड २-१नं आघाडीवर आहे. त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर भारताला ही मॅच जिंकावीच लागणार आहे.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा