India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि पाचवा सामना धर्मशाला येथे (Darmashala test) खेळवला जाणार आहे. भारताने मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतल्याने आता इंग्लंडसाठी अखेरचा सामना महत्त्वाचा असणार आहे. अशातच आता अखेरच्या सामन्यात इंग्लंडने आपला हुकमी एक्का उतरवला आहे. इंग्लंडने अखेरच्या कसोटी सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन (England Announce Playing XI) जाहीर केली अन् एक मोठा बदल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या संघाची जबाबदारी बेन स्टोक्स (Ben Stokes) सांभाळणार आहे. तर चौथ्या कसोटी सामन्यात ऑली रॉबिन्सनला संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच आता इंग्लंडने ऑली रॉबिन्सनच्या जागी मार्क वुडला संघात सामील (Mark Wood Replace Ollie Robinson) करून घेतलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा हुकमी एक्का सामन्यात परतल्याने बेन स्टोक्सने सुटकेचा श्वास घेतला आहे.


पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला तोंड वर करून दिलं नाही. दुसरा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने बरोबरी साधली होती. तर तिसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडवर आघाडी मिळवली. त्यानंतर रांची टेस्टमध्ये विजयी पदरी पाडून टीम इंडियाने मालिकेत विजय मिळवला. आता इंग्लंडने अखेरच्या सामन्यासाठी कंबर कसली आहे. तर टीम इंडिया 4-1 ने विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी मजबूत आघाडी मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.



इंग्लंड प्लेइंग इलेव्हन (England playing XI) : 


बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (C), बेन फोक्स, टॉम हार्टली, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन.


टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India's Probable playing XI) : 


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल/रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.