Stuart Broad retirement: नुकतंच कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स पार करणार्‍या 37 वर्षीय खेळाडून स्टुअर्ड ब्रॉडने द किया ओव्हल येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या ऍशेस कसोटीच्या तिसर्‍या दिवसाच्या समारोपाच्या वेळी सर्वांना धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कीर्तिमान गाजवणाऱ्या स्टुअर्ड ब्रॉडने (Stuart Broad) निवृत्तीची घोषणा केली आहे. (England bowler Stuart Broad has announced retirement from cricket after Ashes 2023)




निवृत्ती घेताना काय म्हणाला Stuart Broad?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या किंवा सोमवार हा माझा क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल. माझ्यासाठी हा सुखद अनुभव होता. काल रात्री साडेआठ वाजता मी ठरवलं. निवृत्तीबाबत मी गेल्या आठवड्यापासून मी विचार करत होतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना माझ्यासाठी सर्वोत्तम होता. अॅशेसमध्ये खेळणं मला प्रचंड आवडायचं. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना माझ्यासाठी नेहमीच शिखराचा राहिलाय. मला वाटतं की माझी शेवटची मॅच ही अॅशेसमध्ये असावी, असं स्टुअर्ड ब्रॉड म्हणाला आहे.


कशी होती ब्रॉडची टेस्टमधील कारकीर्द?


स्टुअर्ट ब्रॉडने 2007 टेस्टमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने पहिला टेस्ट सामना हा श्रीलंकेविरूद्ध खेळला होता. फलंदाजीच्या जोरावर त्याने 243 डावात 3,656 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत. त्याच्या करियरमध्ये त्याने 20 वेळा 5 विकेट्स घेतल्या असून 3 वेळा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. त्याने 243 डावात 3,656 रन्स केलेत. याशिवाय त्याच्या नावे 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत.


आणखी वाचा - England Players Jersey: कुणाच्या अंगावर कुणाची जर्सी? इंग्लंडच्या प्लेयर्सचा अजब 'खेळ', पण कारण कौतुकास्पद!


इंग्लंडकडून खेळताना स्टुअर्ट ब्रॉडने अनेक फलंदाजांची दाणादाण उडवली होती. ब्रॉडने आतापर्यंत 167 टेस्ट सामने खेळले असून 602 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या ऑस्ट्रिलिया विरूद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये त्याने 600 विकेट्सचा टप्पा पार केला. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये मुरलीधरन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या नावाता समावेश आहे.