मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे. कुलदीप यादवनं घेतलेल्या ५ विकेट आणि लोकेश राहुलच्या शतकामुळे भारतानं ही मॅच ८ विकेटनं जिंकली. ३ मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं १-०ची आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडनं चांगली सुरुवात केल्यानंतर कुलदीप यादवच्या स्पिन बॉलिंगपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. इंग्लंडला २० ओव्हरमध्ये १५९ रनवर रोखण्यात भारतीय बॉलरना यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६० रनचा पाठलाग करताना शिखर धवन लवकर आऊट झाला. पण लोकेश राहुल आणि रोहित शर्मानं भारताची पडझड होऊ दिली नाही. नंतर विराट कोहलीनं रन बनवून भारताला विजय मिळवून दिला.


भारताविरुद्ध पराभव झाला असला तरी इंग्लंडच्या टीमनं मात्र सेलिब्रेशन केलं. फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनं कोलंबियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३नं पराभव केला. यामुळे इंग्लंड फूटबॉल वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे.


इंग्लंडच्या या विजयानंतर जॉस बटलरनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर इंग्लंडच्या क्रिकेट टीममधल्या सदस्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू फूटबॉल मॅचमधल्या विजयाचा जल्लोष करत आहेत.