लंडन :  ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी इंग्लंड क्रिकेट टीमला, वर्ल्डकप २०१९ जिंकल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत असताना थेरेसा म्हणाल्या, वर्ल्डकप जिंकल्यानंतर इंग्लड देश पुन्हा क्रिकेट या खेळाकडे आकर्षित झाला आहे. सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, मे यांनी विश्व विजेते ठरलेल्या इंग्लंच्या टीमसाठी सोमवारी रात्री १० डायनिंग स्ट्रीटमध्ये एक रिसेप्शन ठेवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मे यांनी सांगितलं, सगळ्यानी मिळून एक छान पर्फामन्स दिला आहे. ही मॅच आमच्या काळातल्या सगळ्यात चांगल्या मॅच पैकी एक आहे.


मे यांनी इंग्लंडच्या टीमला म्हटलं, तुम्ही एक अशी टीम आहात जी आधुनिक ब्रिटनचं प्रतिनिधीत्व करत आहे, आणि तुमच्यासारखी टीम आता जगात नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या सामन्यांवेळी सर्व गोष्टी तुमच्या विरोधात होत्या, तरी देखील तुम्ही हार पत्करली नाही. याचं दृढ संकल्पनेमुळे तुम्ही आज विश्वविजेता ठरला आहात.


पुढे मे म्हणाल्या , तुम्ही या देशाला परत एकदा क्रिकेटकडे आकर्षित केले आहे. आमच्याकडे एक अशी टीम आहे, ज्या टीमची आठवण पुढच्या पिढीला वेळोवेळी होणार आहे.