कार्डिफ : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला. कुलदीप यादव आणि लोकेश राहुल भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कुलदीप यादवनं ४ ओव्हरमध्ये २४ रन देऊन इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. यानंतर लोकेश राहुलनं शतक करून भारताला मॅच जिंकवून दिली. कुलदीप यादवच्या स्पिनपासून निपटण्यासाठी आता इंग्लंडनं नवी रणनिती आखली आहे. सराव करताना बॉलिंग मशिन वापरून इंग्लंडची टीम कुलदीपपासून निपटण्याचा प्रयत्न करणार आहे. याआधी फास्ट बॉलरचा सामना करण्यासाठी बॉलिंग मशिनचा वापर केला जायचा. इंग्लडनं याआधीही स्पिन बॉलिंगसाठी बॉलिंग मशिनचा उपयोग केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००५ साली ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्न जबरदस्त फॉर्ममध्ये होता. शेन वॉर्नच्या बॉलिंगपासून निपटण्यासाठी तेव्हा इंग्लंडन बॉलिंग मशिनचा उपयोग केला होता. मर्लिन असं या मशिनचं नाव आहे. या मशिनमध्ये सगळ्या प्रकारच्या स्पिन बॉलिंगचा समावेश आहे. २००५ साली इंग्लंडनं या मशिनचा वापर केला होता पण याचा फायदा त्यांना झाला नव्हता. २००५ सालच्या अॅशेस सीरिजमध्ये शेन वॉर्ननं ५ मॅचमध्ये ४० विकेट घेतल्या होत्या.


पहिल्या टी-२० मध्ये कुलदीप यादवनं ९व्या ओव्हरनंतर इंग्लंडच्या बॅट्समनना त्रास द्यायला सुरुवात केली. कुलदीप यादवच्या बॉलिंगपुढे फॉर्ममध्ये असलेल्या जॉस बटलरलाही नमतं घ्यावं लागलं. शेवटच्या ओव्हरमध्ये कुलदीपनं दोनवेळा बटलरला चकवलं. यानंतर मात्र बटलरनं हवेत बॉल मारला आणि कॅच देऊन बसला.