England vs Pakistan: आजपासून पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेला (Test Match) सुरूवात झाली आहे. तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडने जीवाची बाजी लावत इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. रावळपिंडीच्या स्टेडियमवर (Rawalpindi Cricket Stadium) पहिला सामना खेळला जातोय. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार इंग्लंडने यजमान पाकिस्तानी बॉलर्सच्या चिंधड्या उडवल्या. इंग्लंडने पहिल्या डावात आत्तापर्यंत 506 धावा केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान म्हणजे वाद हे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय. कोणतीही टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर असो... वाद हा होणारच. पाकिस्तानला घेरलंय ते दहशतवाद्यांनी (Terrorist attack in Pakistan). काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौरा (New Zealand's tour of Pakistan) अचानक रद्द केला. त्यानंतर आता पाकिस्तानमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.


पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला -


इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या (England tour of Pakistan) दौऱ्यावर असताना पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आहे. क्वेट्टा येथे पोलिसांच्या वाहनावर आत्मघाती बॉम्बस्फोट झालाय. या बॉम्बस्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यांसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तसेच डझनभर लोक जखमी देखील झालेत. त्यामुळे आता इंग्लंडच्या खेळाडूंचा जीव खुंटीवर टांगला गेलाय.


पीसीबीचं मोठं नुकसान -


सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानला अनेकदा मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. कोणताही संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नसल्याने पीसीबी (PCB) म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठं नुकसान सहन करावं लागलं. 2008 साली पाच देशांनी चॅम्पियन ट्रॉफी (Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर 2009 मध्ये श्रीलंकेच्या टीमवर झालेला जीवघेणा हल्ला देखील झाला होता. त्यानंतर पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. 


आणखी वाचा - वनडे सामन्यात का ठरतोय Suryakumar Yadav फेल? Wasim Jaffer ने सांगितली सूर्याची चूक


दरम्यान, श्रीलंका टीमवर (attack on the Sri Lanka national cricket team) झालेल्या हल्ल्यात महेला जयवर्धने, कुमार संगकारा, अजंथा मेंडिस, थिलन समरवीरा, चामिंडा वास हे खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर 2011 साली (World Cup 2011) भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कप सामना खेळला जाणार होता. मात्र, पाकिस्तानची दयनीय सुरक्षा व्यवस्था पाहता सामने भारतात खेळवले गेले.