IND vs ENG, 3rd T20: इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंडच्या भूमीवर टी-20 मालिका क्लीन स्वीप करण्याची भारताला चांगली संधी आहे.
मुंबई : तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया फिल्डींगसाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान आता प्रथम बॅटींग करून इंग्लंड किती धावांचा डोंगर उभा करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या मालिकेतील शेवटचा सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जातोय आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा सामना जिंकून इंग्लंडवर 0-3 असा विजय मिळवायचा आहे. त्यामुळे भारताला क्लिन स्वीप मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना साउदम्प्टन येथे खेळला गेला. तर बर्मिंगहॅम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने त्याचा 49 धावांनी पराभव केला. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, फिलिप सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टन, हॅरी चारिंग्टन ब्रूक, मोईन अली, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लेसन, रीस टोपले
भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (डब्ल्यूके), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक, रवी बिश्नोई.