मुंबई: मैदानात अनेक दुखापती होत असतात त्यामुळे बऱ्याच शस्त्रक्रिया देखील कराव्या लागतात. नुकतीच जोफ्रा आर्चरच्या हातावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून तो इंग्लंड सीरिजमध्ये खेळणार नाही अशी अपडेट देखील मिळाली आहे. जोफ्राच्या घातक गोलंदाजीसमोर भलेभले फलंदाज आऊट होतात. अशाच अजून एका गोलंदाजाबद्दल जाणून घेणार आहोत. या गोलंदाजाच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं. त्यानंतर तो जेव्हा मैदानात परतला तेव्हा त्याला जलवा पाहायला मिळाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवान गोलंदाजीसाठी स्पीड आणि पायात ताकद आवश्यक असते. अशा गोलंदाजांना पायांचा दुखापती किंवा समस्या होतात आणि त्यामुळे मैदानापासून काहीकाळ दूर राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. 


इंग्लंडचे वेगवान गोलंदाज बॉब विलिस यांनी आपली जिद्द सोडली नाही. वयाच्या 26 व्या वर्षी दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करावं लागलं. त्यानंतर काही काळ मैदानापासून दूर राहून पुन्हा मैदानात आल्यानंतर त्यांचा जलवा पाहायला मिळाला होता. डाव्या हाताने गोलंदाजी करणारे बॉब विलिस यांनी 90 कसोटी सामने खेळून 325 विकेट्स घेतल्या आहे. 64 वन डे सामने खेळून 80 विकेट्स घेतल्या होत्या. 


1975मध्ये बॉबी विलिस यांच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करावं लागलं. त्यावेळी त्यांचं वय 26 वर्ष होतं. ते केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे आणखी शस्त्रक्रियेनंतरही 9 वर्ष खेळले. पुढे त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांचं 4 डिसेंबर 2019मध्ये त्यांचं निधन झालं. 


बॉब यांनी 1981मध्ये हेडिंग्ले कसोटी मालिका खेळली होती. पहिल्या सामन्यात त्यांना एकही विकेट मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात त्यांनी 8 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या विजयामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यांनी 43 धावा देऊन 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या कारकीर्दीत 90 कसोटी सामन्यांपैकी त्यांनी 18 वेळा वेगवेगळ्या संघाच्या कर्णधारांना आऊट केल्या अनोखा रेकॉर्ड आहे. त्यांनी 308 प्रथम श्रेणीतील सामने देखील खेळले होते.