India vs England playing XI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी (IND vs ENG 2nd Test) सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाला दोन धक्के बसलेत. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर गेल्याने कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) नव्या अडचणींना समोरं जावं लागणार आहे. अशातच आता इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सचं (Ben Stokes) टेन्शन देखील वाढलंय. टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं


दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंना संधी विकेट्स घेण्याची मिळू शकते. विशाखापट्टनमची खेळपट्टी फिरकीपटूंना पुरेशी असू शकते. त्यामुळे इंग्लंडची आणखी डोकेदुखी वाढणार आहे. अशातच इंग्लंडचा सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज जॅक लीच इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असू शकतो. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान जॅक लीचच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि आता या दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. 


जॅक लीच नाही तर मग कोण?


इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी चार फिरकीपटूंसोबत मैदानात जाऊ शकतं, असे संकेत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रँड मॅक्युलम यांनी दिले होते. मात्र, आता असं शक्य होईल का? असा सवाल विचारला जातोय. रेहान अहमद, जॅक लीच, जो रूट आणि टॉम हार्टली या फिरकीपटूंसह इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर आली होती. आता जॅक लीच जखमी झाल्यानंतर शोएब बशीर हा भारतात परतण्याची शक्यता आहे.


पाहा टीम इंडियाचा संपूर्ण स्कॉड -


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (WK), ध्रुव जुरेल (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.


इंग्लंडचा संपूर्ण संघ -


बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) ), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.