Virat Kohli: रोहितनं लाख सांगूनही विराटनं केली मनमानी; इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात मोठी चूक
Virat Kohli: 7 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड विलीने विराट कोहलीला ( Virat Kohli ) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या सामन्यात विराट शून्यावर आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याचा कॅच घेतला. यावेळी विराटची विकेट काढण्यासाठी जणू प्लॅन संपूर्ण टीमनेच केला होता, असं वाटत होतं
Virat Kohli: रविवारी लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 100 रन्सने इंग्लंडचा पराभव केला. गोलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना जिंकला. मात्र फलंदाजांमध्ये रोहित शर्मा ( Rohit sharma ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यावेळी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात विराटला ( Virat Kohli ) भोपळाही फोडता आला नाहीये.
टीम इंडियाच्या फलंदाजांची खराब कामगिरी
लखनऊमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधार जॉस बटलरने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. फलंदाजीला उतरल्यावर अवघ्या 40 रन्समध्ये टीम इंडियाने 3 विकेट्स गमावले होते. अखेरीस 9 विकेट्स गमावून टीम इंडियाने इंग्लंडला 230 रन्सचं टार्गेट दिलं होतं.
विराटने रोहितचं ऐकलं नाही आणि...
7 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड विलीने विराट कोहलीला ( Virat Kohli ) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या सामन्यात विराट शून्यावर आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याचा कॅच घेतला. यावेळी विराटची विकेट काढण्यासाठी जणू प्लॅन संपूर्ण टीमनेच केला होता, असं वाटत होतं.
7 व्या ओव्हरमध्ये विराटने ( Virat Kohli ) सलग 4 बॉल खेळले. यावेळी त्याने अनेक प्रयत्न केले पण त्याला रन घेणं शक्य झालं नाही. त्यानंतर 5व्या बॉलवर तो विलीच्या जाळ्यात कॅचआऊट झाला. यामध्ये विशेष म्हणजे रोहितने ( Rohit sharma ) विराटला समजावलं होतं की, मिडऑफमध्ये फिल्डर असतो. बॉल चांगल्या गुड लेंथ येऊ शकतो. विराटने आधी संयम राखला पण नंतर तो विकेट गमावून बसला. त्याने मिड ऑफलाच शॉट खेळला.
रोहित शर्माने सावरला डाव
टीम इंडियाची एका बाजूने पडझड होता असताना कर्णधार रोहित शर्माने ( Rohit sharma ) मात्र डाव सावरला. रोहितने ( Rohit sharma ) सर्वाधिक 87 रन्सचं योगदान दिलं. त्याने 101 बॉल्सच्या खेळीत 10 फोर आणि 3 सिक्स मारले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने 49 रन्स केले. रोहितच्या उत्तम खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला.