IPL 2024, CSK vs RCB : आयपीएलचा 17  व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा पराभव केला. चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंसर्ज बंगळुरुचा 6 विकेट्स राखून पराभव केला. तसेय आयपीएलच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करतान आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 6  विकेट्स गमावून 173 धावा केले. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने  8 चेंजू बाकी असताना 176 रन्स करुन सामना जिंकला आहे. या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव केला. पहिल्याच सामन्यात चेन्नईने विजय मिळवून आयपीएलचा श्रीगणेशा केला आहे. तर दुसरीकडे आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस ला पराभवचा का सामना करावा लागला ते स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आयपीएल 2024 मध्ये चेन्नई संघा पदार्पण केलेल्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. बंगळूरूने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला. यावेळी 28 चेंडूंचा सामना करताना दुबेने 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 34 धावा केल्या. याशिवाय जडेजाने 17 चेंडूत नाबाद 25 धावांची खेळी करत संघाचा विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सलामीला आलेल्या कर्णधार गायकवाडने 15 धावा केल्या, तर रचिन रवींद्रने 15 धावा करत 37 धावा केल्या. याशिवाय अजिंक्य रहाणे (27 धावा), डॅरिल मिशेल (22 धावा) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत मुस्तफिजुर रहमानने 4 बळी घेतले, तर फलंदाजीत रचिनने 37 धावा आणि डॅरेल मिशेलने 22 धावा केल्या. चेपॉकमध्ये सलग 8व्या पराभवाचा सामना करणाऱ्या आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सामन्यानंतर चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले.


पराभवानंतर फाफ  डु प्लेसिस काय म्हणाला?


सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितले की, चेन्नईचा संघ मधल्या षटकांमध्ये चांगला खेळतो. कदाचित आम्ही 15-20 धावांनी कमी पडलो. पहिल्या 10 षटकांमध्ये आम्ही खेळलो तशी खेळपट्टी खराब नव्हती. पाठलाग करताना ते नेहमीच पुढे होते, आम्ही काही विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्याकडे पुरेशा धावा झाल्या नाहीत.


फाफ डू प्लेसिसने अनुज, डीकेचे केले कौतुक


फाफ डू प्लेसिसनेने अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या फलंदाजीचे कौतुक केले. अशी सुरुवात करणे दिनेशसाठी खूप मोठा दिलासा होता. जास्त क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूकडून येणे खूपच मनोरंजक होते. तो म्हणाला की, अनुजने आमच्यासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने त्याच्या कामगिरीने तो किती संयमी आहे हे दाखवून दिले. एवढेच नाही तर तो संघाची ताकद म्हणून समोर आला आहे.