मुंबई : टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी एक कुटुंब चक्क सिंगापूर येथून लंडनला चक्क गाडीने प्रवास करत पोहोचली आहे. विश्वास बसणार नाही पण हे खरंय. १७ मेला सिंगापूर येथून निघालेलं हे कुटुंब १७ देशांच्या सीमा पार करत ५ जुलैला लंडनला पोहोचले आहेत. या भारतीय कुटुंबाला आशा आहेत की भारतीय टीम फायनलमध्ये नक्की धडक देईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमध्ये पोहोचण्यापर्यंतचा प्रवास या कुटुंबाला अनेक अनुभव देणारा होता. अनुपम माथुर यांनी म्हटलं की, "फेब्रुवारीमध्ये जेव्हा वर्ल्डकपची घोषणा झाली तेव्हाच लंडनला जाऊन फायनल सामना पाहण्याचं नक्की झालं होतं. पण हा सामना पाहण्यासाठी काही तरी वेगळं करण्याचं डोक्यामध्ये आलं. त्यानंतर ही योजना बनवली. त्यानंतर व्हीजा जमवायला सुरुवात केली. प्रवासादरम्यान येणाऱ्या सर्व देशांकडून परवानगी घेत १७ मेला या प्रवासासाठी निघालो.'


अनुपम यांच्या पत्नी अदिती यांनी या प्रवासादरम्यानच्या अनेक घटना शेअर केल्या. त्यांनी म्हटलं की, चीन आणि किर्गिस्तानमध्ये प्रवासादरम्यान अचानक बर्फवृष्टी सुरु झाली. या प्रवास फार धोकादायक वाटत होता. मागे जाता येत नव्हतं कारण चीनकडून फक्त रस्त्याने जाण्याचा व्हिजा मिळाला होता. त्यामुळे तेथे थांबता येत नव्हतं. घाटातून जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला संरक्षण भींत देखील नव्हती. २ मुलं आणि सासू-सासरे सोबत होते. त्यामुळे अधिक भीती वाटत होती. पण पुढे जाऊन एक लहान गाव दिसलं. जेथे एका छोट्या घरात रात्रभर थांबलो.


अदिती यांनी पुढे सांगितलं की, बॉर्डर क्रॉस करतान धडकी भरायची. सीमेवर हत्यारांसोबत सैनिक उभे असायचे. त्यांची भाषा कळत नव्हती. बॉर्डर क्रॉस करताना कागदपत्र दाखवावे लागत होते. भाषा कळत नसल्याने शंकेच्या आम्हाला मारणार तर नाही याची भीती वाटत होती.


अनुपम यांनी म्हटलं की, मॉस्कोच्या पुढे आल्यावर असा रस्ता होता. ज्याची माहिती इंटरनेटवर पण नव्हती. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने पुढे येत राहिलो. मॉस्को येथून एक सरळ रस्ता लंडनला येतो तर दुसरा स्वीडनला जातो. ३ पिढ्या रेखावृत्तांवर एकत्र प्रवास करणारे जगातील कदाचित आम्ही पहिलं कुटुंब असू.


अर्ध्या रात्री सूर्यास्त आणि सूर्योदय


२१ जूनला मध्यरात्री कधी रात्र नाही होता. २४ तासात सूर्य चमकतो. आम्ही स्वीडनच्या जुकासबरी येथे २८ जूनला पोहोचलो. येथे रात्री १२ ला देखील सूर्य चमकत होता. हे एक अद्भुत दृष्य होतं. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सूर्यास्त झाला आणि १५ मिनिटांनी सूर्योदय झाला.
 
मलेशिया, थायलंड, लाओस, चीन, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, रशिया, फिनलँड, स्वीडन, डेनमार्क, जर्मनी, बेल्ज‍ियम, नेदरलँड, फ्रान्स या मार्गाने ते इंग्लंडला पोहोचले. या दरम्यान त्यांनी १७ देशांच्या सीमा पार करत एकूण २२,६०० किलोमीटरचा प्रवास केला. त्यांचं लक्ष्य ६० दिवसात २५ हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचं आहे.


अनुपम माथुर यांच्यासोबत त्यांची पत्नी अदिती, वडील अखिलेश, आई अंजना, ६ वर्षाचा मुलगा मुलगा अवीव आणि एक तीन वर्षाची मुलगी होती. १५ जुलैला फायनल सामना झाल्यानंतर ते विमानाने सिंगापूरला जाणार आहेत. गाडी ते जहाजाने पाठवणार आहेत.