मुंबई : यंदा ५ सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी बरोबरच शिक्षकदिनही जोरदार साजरा करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील गुरूस्थानी असलेल्या व्यक्तींना मानवंदना दिली. काही सेलिब्रिटींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा केला. 


बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिने I Hate my teacher या खास व्हिडीओमधून तिचा प्रवास उलगडला. तर सचिन तेंडूलकरने आचरेकर सरांबरोबरची खास आठवण शेअर केली. भारतीय क्रिकेटर विराट कोहली यानेदेखील त्याच्या आयुष्यातील शिक्षकांबद्दल खास ट्विट शेअर केले. पण ट्विटरकरांनी मात्र त्याची खिल्ली उडवली. 




विराटने क्रिकेट विश्वातील त्याच्या गुरूंचा खास उल्लेख केला होता. यावेळी ट्विटरवरील मंडळींनी याचा संबंध विराट- अनिल कुंबळे यांच्यातील वादाशी जोडून त्याचीच खिल्ली उडवली. विराटला अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून पसंत नव्हते. त्यांच्यामध्ये वाद होते. विराट प्रशिक्षक बदलाची मागणी बीसीसीआयकडे केली होती. भारतीय संघांच्या प्रशिक्षकपदासाठी  रवी शास्त्री  यांच्या नावाची शिफारसही त्याने केली होती.  


सध्या रवी शास्त्री भारतीय संघांचे प्रशिक्षक आहेत. विराट आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादही आता निवळला आहे. मात्र ट्विटरवर त्याच्या फॅन्सनी या गोष्टीची त्याला पुन्हा आठवण करून दिली आहे.