मुंबई : पाकिस्तानच्या क्रिकेट टीममध्ये वेगवान बॉलरची कमी नसते. नव्वद आणि २०००च्या दशकात वसीम अक्रम, वकार युनिस, शोएब अख्तर या वेगवान बॉलर्सची चर्चा होती. यानंतर मोहंमद आमिर आणि हसन अलीने दमदार बॉलिंग केली, आता पाकिस्तानच्या टीममध्ये आणखी एका दमदार आणि वेगवान बॉलरचा प्रवेश झाला आहे. या बॉलरचं नाव मोहंमद अब्बास असं आहे. पाकिस्तानी टीममधील अब्बास हा १८ वर्षांचा आहे. अब्बासने २०१७ मध्ये वेस्टइंडिज विरूद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. मोहंमद अब्बासने क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याची बॉलिंग बॅटसमनवर तुटून पडते.


इंग्लंड आणि आयरलँडच्या बॅटसमनला नाचवलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्बासचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला चेंडू स्विंग करता येतो. याच आधारावर त्याने इंग्लंड आणि आयरलँडच्या बॅटसमनला नाचवलं.


१४ ओव्हर्समध्ये ७ ओव्हर अब्बासने मेडन टाकल्या


अब्बास सध्या इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या टेस्ट सामना खेळण्यात व्यस्त आहे. हा सामना लॉर्डसवर सुरू आहे. अब्बासने पहिल्या सामन्यात दणकट बॉलिंग केली. १४ ओव्हर्समध्ये ७ ओव्हर अब्बासने मेडन टाकल्या आणि २४ रन देऊन ४ विकेट देखील घेतल्या. अब्बासच्या कडक वेगवान बॉलिंगपुढे, इंग्लंडची टीम १८४ रन्सवर गुंडाळली गेली. सध्या पाकिस्तानने सामन्यावर आपली पकड जमवली आहे.


 तो विकेट काढण्यातही मागे नाही


अब्बासच्या चेंडूवर रन काढणे सोपं नाही, आतापर्यंत अब्बास ७ टेस्ट मॅचेस खेळला आहे. या दरम्यान त्याने ६८ मेडन टाकलेले आहेत. तो विकेट काढण्यातही मागे नाहीय. एवढंच नाही तर ३६ विकेट देखील घेतल्या आहेत. आशिया खंडातील बॉलर बाहेरच्या खंडात एवढी चांगली बॉलिंग करत नाहीत, असं म्हणतात, पण अब्बासने इंग्लंड आणि आयरलँडमध्येही जोरदार प्रदर्शन केलं आहे. आयरलँडमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव टेस्ट क्रिकेटमध्ये अब्बासने ९ विकेट घेतल्या. अब्बासला पाकिस्तानच्या वनडे टीममध्ये घेण्याची शक्यता आहे.