Shreyas Iyer : शुक्रवारी ईडन गार्डन्सवर रन्सवर अक्षरशः पाऊस पडला. या सामन्यात पंजाब किंग्जसने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. यावेळी पंजाब किंग्जने या विजयासह (Punjab Kings) शुक्रवारी टी-20 च्या इतिहासात आपले नाव कोरलं. पंजाबने सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वात मोठे लक्ष्य गाठले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 261 रन्स केले. त्यानंतर पंजाबने 262 धावा केल्या आणि 8 विकेट्स राखून विजय मिळवला. सामना गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर खूपच निराश दिसत होता. 


पराभवानंतर काय म्हणाला श्रेयस अय्यर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. मात्र आम्ही दिलेल्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरलो. सुनील नरीन आणि फिल सॉल्ट यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते कौतुकास्पद होती. मुळात या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सनी उत्कृष्ट कामगिरी केली.


नेमकी या सामन्यात चूक कुठे झाली ते आम्हाला शोधावं लागणार आहे. एवढी मोठा स्कोर उभारल्यानंतर पराभव स्विकारणं फार वाईट वाटतंय. पण या चुकांमधून शिकले पाहिजे. घरच्या मैदानावर अजून एक सामना बाकी आहे, आम्ही परिस्थिती समजून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. सुनील नरीनला आक्रमक फलंदाजी करताना पाहणं खूप छान वाटते, आशा आहे की तो असाच त्याचा खेळ पुढे सुरु ठेवेल, असं श्रेयस म्हणाला.


पंजाबचा कोलकात्यावर दमदार विजय


या सामन्यात टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 6 विकेट्स गमावून 261 रन्स केले होते. यावेळी फिल सॉल्टने 75 रन्स, सुनील नरीनने 71 रन्स आणि व्यंकटेश अय्यरने 39 रन्स केले होते. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 18.4 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 262 रन्स केले. प्रभसिमरन सिंगने 54 रन्सची खेळी केली केल्या. याशिवाय जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूंमध्ये 108 रन्स केले. तर शशांक सिंग ६८ रन्स करून नाबाद राहिला.