दु:खातून बाहेर पडण्यासाठी स्टार खेळाडू पत्नीसोबत सुट्टीवर
दु:खातून बाहेर पडण्यासाठी क्रिस्टोफर सध्या वर्ल्ड टूरवर गेला आहे.
नवी दिल्ली: इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू क्रिस्टोफर स्मालिंग सध्या सुट्टीवर असून, मॉडेल पत्नी सॅम कूकसोबत आनंद साजरा करत आहे. खरेतर संघातून बाहेर पडावे लागल्यामुळे तो प्रचंड दु:खी झाला होता. फीफा विश्वचषकासाठी जेव्हा इंग्लंडने आपला संघ जाहीर केला त्यात त्याचे नाव नव्हते. त्यामुळे त्याला धक्का बसला होता. त्यामुळे या दु:खातून बाहेर पडण्यासाठी क्रिस्टोफर सध्या वर्ल्ड टूरवर गेला आहे.
एका पार्टीदरम्यान पहिली भेट
दरम्यान, मँचेस्टर युनायटेड प्लेय ऑफ द इयर अवॉर्ड फंक्शनदरम्यान मॉ़डेल सॅम कूक आपल्या ड्रेसमुळे चर्चेत आली होती. एफ.एच. एम. ए फ्रंट, मॅक्झिम, लोडेड, नट्स यासारख्या बोल्ड मासिकांसाठी फोटोशूट करणाऱ्या सॅम आणि क्रिस्टोफर स्मालिंग यांची पहिली भेट एका पार्टीदरम्यान झाली होती.
क्रिस्टोफर अनुभवी खेळाडू
बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर सॅम आणि क्रिस्टोफर यांनी गेल्या वर्षी विवाह केला होता. या विवाहासाठी वेन रूनी, ल्यूक शॉ, फिल जोन्स आणि सॅम जॉनस्टोन यांच्यासारखे अनेक दिग्गज उपस्थित होते. क्रिस्टोफरने आतापर्यंत क्लब पातळीवर २०० तर इग्लंडकडून ३१ सामने केळले आहेत.