रशिया : फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला २-१ ने नमवून बेल्जियमने उपांत्य फेरीत धडक मारलीय. या पराभवामुळे ब्राझीलंच विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले असून सहाव्यांदा विश्वचषकाला गवसणी घालण्याचं. ब्राझीलवासियांचं स्वप्न भंगलंय. तर विश्वचषक उंचावण्याचं नेमारच्या स्वप्नांवरही पाणी फेरलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फिफा विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा बेल्जियम संघ उपांत्य फेरीत पोहचलाय. आता मंगळवारी बेल्जियमचा सामना फ्रान्सशी होणार आहे. याचबरोबरच विश्वचषकातील पाचही प्रबळ दावेदार स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. 



फ्रान्सनं फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. फ्रान्सनं उरुग्वेचा २-० नं पराभव करत उपांत्य फेरीचा आपला प्रवेश निश्चित केला. फ्रान्सकडून ४० व्या मिनिटाला राफिल वर्नेनं हेडरवर केलेला  गोल आणि ग्रिझमननं ६१ व्या मिनिटाला गोल झळकावत आपल्या संघाच्या विजयाचा मार्ग मोकळला केला. तर या पराभवामुळे उरुग्वे संघाचं फुटबॉल विश्वचषकातील आव्हानं संपुष्टात आलं.


उरुग्वेकडून दुखापतीमुळे बाद फेरीचा हिरो कवानी या सामन्यात खेळू शकला नाही. आणि याचा मोठा फटका बसला. तर स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेझची जादूही या सामन्यात पहायाला मिळाली नाही. तर उरुग्वेचा बचाव यशस्वीपणे भेदण्यात या सामन्यात फ्रान्सला यश आलं.