मुंबई : फुटबॉलप्रेमीं सध्या फुटबॉल विश्वचषकाच्या रंगात रंगून गेलेत... सर्वच ठिकाणी फुटबॉल फिव्हर पहायला मिळतोय. याच विश्वचषकात फुटबॉलपटूंच्या गर्लफ्रेंड्सनीही साऱ्यांचंच लक्ष वेधलंय. 


ख्रिस्तियानो रोनाल्डो-जॉर्जिना रॉड्रीगेज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पॅनिश ब्युटी जॉर्जिना रॉड्रीगेजनं ख्रिस्तियानो रोनाल्डोवर चांगली मोहिनी टाकलीय. जगातील सगळ्या लोकप्रिय फुटबॉलपटूची ती गर्लफ्रेंड आहे. रोनाल्डोच्या सामन्यांसाठी ती कायमच स्टेडियममध्ये हजेरी लावते. आणि त्याला चीअर करते. रोनाल्डोप्रमाणेच जॉर्जिनाही आता फुटबॉलप्रेमींमध्ये लोकप्रिय झालीय.


लिओनेल मेसी-अँटोनिला रोकुझा


लिओनेल मेसी आपली बालमैत्रीण अँटोनिला रोकूझा यांची जोडी सुपरहिट आहे. गेल्या वर्षी हे दोघं विवाह बंधनात अडकले. अँटोनिला आणि मेसी यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आणि नंतर त्यांनी लग्नाच्या बेडित अडकण्याच निर्णय घेतला. 


शकीरा-जेराड पिके


पॉपस्टार शकीरा आणि जेराड पिके या जोडीचीही चांगलीच चर्चा फुटबॉल वर्तुळात होत असते. शकिराच्या गाण्याचे तर सारेच चाहते आहेत. 2014 फुटबॉल विश्वचषकाचं थीम साँग वाका...वाका... मुळे तर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. जेराड आणि शकिरा स्पेननं फुटबॉल विश्वचषक जिंकल्यानंतर या गाण्यावर ठेकाही धरला होता. फुटबॉलच्या दुनियेतील हे सर्वात हॉट अँड हॅपनिंग कपल आहे.


डेव्हिड-एडूर्ने ग्रेशिया


स्पेनचा गोलरक्षक डेव्हिड दी गिया गायक आणि अभिनेत्री एडुर्गेन ग्रेशियाला डेट करतोय. ग्लॅमरस ग्रेशिया आणि डेव्हिडही फुटबॉलच्या दुनियेत कायमच चर्चेचा विषय ठरतात.


रॉबर्ट-अॅना लेवांडोवस्की


आपल्या निळ्या डोळ्यांनी अॅना लेवाडन्स्कीनं पोलिश संघाचा कर्णधार रॉबर्टवर आपली मोहिनी टाकली. अॅना एक कराटे खेळाडू आहे. फुटबॉलपटू आणि कराटे खेळाडूची ही जोडीही फुटबॉलप्रेमींममध्ये अतिशय लोकप्रिय आहे.