अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई: खरं म्हणजे रशिया हा तसा थंड वातावरणाचा देश. पण, एरवी थंड असणाऱ्या या देशाचे वातावरण फीफा वर्ल्ड कपने भलतेच तापवले आहे. यात खरी आग लावली आहे ती, फीफा वर्ल्ड कपची ब्रँड अँम्बॅसडर व्हिक्टोरिया लॉपरेवा हिने. व्हिक्टोरियाला फीफाची ब्रँड अँम्बॅसडर म्हणून घोषीत करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडिया आणि इंटरनेटवर फुटबॉलप्रेमींनी तिचे फोटो आणि माहिती शोधण्याचा धडाकाच लावला आहे. सोशल मीडियावर व्हिक्टोरियाचे एक मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्ससाठी व्हिक्टोरियाही मग आपले हटके फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. अशा या व्हिक्टोरियाबद्दल... 


सौंदर्यवती लॉपरेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिक्टोरिया लॉपरेवा हे रशियातील एक सुप्रसिद्ध आणि तितकेच वलयांकीत नाव. २००३मध्ये मिस रशियाचा किताबही तिच्या नावावर आहे. मॉडेलिंगह आणि अँकरींगमध्ये रमणारी व्हिक्टोरिया एका टीव्ही शोची होस्टही आहे. वय वर्षे ३४ असलेल्या व्हिक्टोरियाने बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी संपादन केली आहे. शाळेत असल्यापासूनच व्हिक्टोरियाचे व्यक्तीमत्व उठावदार होते. त्यामुळे तिला अनेक ऑफर्सही येत. आपले शिक्षण पूर्ण करताच १९९९ मध्ये ती पहिल्यांदा मॉडेलिंग क्षेत्रात आली. त्यानंतर तिने मिस रशिया सोबतच 'फेस ऑफ द इअर', 'मॉडेल ऑफ डॉन' असे अनेक पुरस्कारही जिंकले. 


सोशल मीडियावर प्रचंड चाहते


रशियाची ही सौंदर्यवती सोशल मीडिया आणि इंटरनेटवरही जोरदार अॅक्टीव्ह असते. इंन्स्टाग्रामवर तिचे एक मिलियनपेक्षाही अधिक चाहते आहेत. ही संख्या अनेक नामवंत क्लबच्या चाहत्यांपेक्षाही अधिक आहे. फीफा वर्ल्डकपदरम्यान व्हिक्टोरिया लोकांना हेल्दी लाईफ स्टाईलबाबत जागरूकता निर्माण करताना दिसेन. तसेच, फीफादरम्यानचे काही इव्हेंटलाही ती हजेरी लावेन.


..अन रशियाला एक अँकर मिळाली


सुरूवातीच्या काळात व्हिक्टोरिया ही फुटबॉलची अगदी सर्वसामान्य चाहती होती. मँचेस्टर युनायडेटड हा तिचा अत्यंत आवडता क्लब होता. सन २००७मध्ये तीला रशियाच्या एका टीव्ही शो 'फुटबॉल नाईट'मध्ये अँकरींग करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे रशियाला एक नवी अॅकर मिळाली आणि व्हिक्टोरिया फुटबॉलची दिवानी झाली. विशेष असे की, आजही मँचेस्टर युनायटेड हाच तिचा फेवरेट क्लब आहे.


राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून थेट निवड..


रशियातील मीडिया आणि नागरिकांमध्ये असलेली चर्चा अशी की, व्हिक्टोरियाला वर्ल्ड कप गर्ल बनविण्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हात आहे. सांगितले जाते की, एका फुटबॉल प्रोग्रामचे अँकरींग करताना पुतीन यांनी व्हिक्टोरियाला पाहिले होते. तेव्हापासून ती त्यांच्या ध्यानात होती. जेव्हा वर्ल्ड कप गर्लसाठी शोध सुरू झाला तेव्हा, व्हिक्टोरियाचे नाव पुढे करण्यात आले. व्हिक्टोरिया ही पुतीन यांची कट्टर समर्थक आहे. निवडणूक काळात तिने आपल्या सोशल मीडिया अकांऊंटवरून चाहत्यांना पुतीन यांना मत देण्याचे आव्हान केले होते. 


व्हिक्टोरियाला कोण आवडते?


एका सर्व्हेचा कल पाहिला तर, बहुतांश मुली या फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, नोमार, मेस्सीला अधिक पसंती देतात. पण, व्हिक्टोरियाला तो खूपच साधा वाटतो. पण तुला कुणात फुटबॉलपटू आवडोत असे विचारताच ती क्षणाचाही विलंब न लावता पॉल पोग्बाचे नाव घेते. ती म्हणते, तो खूपच स्टायलीश आहे. त्याचे ड्रेसिंग अत्यांत जबरदस्त असते.