FIFA World Cup 2022 मध्ये धक्कादायक निकाल; वर्ल्ड नंबर-2 फिफा विश्वचषकातून बाहेर!
Croatia vs Belgium: गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसरा क्रमांक पटकावला होता, मात्र यावेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता.
Croatia vs Belgium FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्ड कपमध्ये 2022 मध्ये उलटफेरीचं सत्र सुरूच आहे. ग्रुप-एफ मधील गतविजेता क्रोएशिया आणि बेल्जियम (Croatia vs Belgium) यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. दोन्ही संघांमधील सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर जगातील नंबर-2 संघ असलेला बेल्जियम फिफा वर्ल्ड कपमधून (FIFA World Cup 2022) बाहेर पडला आहे, तर क्रोएशियाच्या (Belgium knocked out as Croatia) संघाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. (FIFA World Cup 2022 Belgium knocked out as Croatia secure last 16 spot marathi news)
गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसरा क्रमांक पटकावला होता, मात्र यावेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता. बेल्जियमला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवणं आवश्यक होते, परंतु बेल्जियम केवळ सामना ड्रॉ (Croatia 0-0 Belgium) करू शकला. त्याचवेळी, क्रोएशियाला पुढील फेरीत जाण्यासाठी फक्त पराभव टाळण्याची गरज होती.
अहमद बिन अली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बेल्जियमने रोमेलू लुकाकू (Romelu Lukaku) आणि ईडन हॅझार्डसारख्या (Eden Hazard) अनुभवी खेळाडूंना सुरुवातीच्या इलेव्हनमध्ये संधी न देण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेकांनी निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता बेल्जियम (Belgium) आव्हान संपुष्टात आलंय.
आणखी वाचा - FIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित
दरम्यान, सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघांची डिफेन्स मजबूत असल्याचं पहायला मिळालं. मात्र, अखेरच्या काही मिनिटात सर्वांनी जीव तोडून प्रयत्न केले. बेल्जियमने (Belgium knocked out as Croatia secure last 16 spot) अखेरीस आक्रमक खेळ दाखवला. मात्र, एकही गोल करण्यास त्यांना यश आलं नाही.