Argentina vs France:  कतारमध्ये (Qatar) सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2022 च्या फायनलसाठी (2022 FIFA World Cup Final) आता दोन संघ निश्चित झाले आहेत. फ्रान्सने (France) मोरोक्कोचा पराभव करत आफ्रिकन आणि अरब देशांच्या स्वप्नांची धूळधाण केली. त्यामुळे आता फिफा वर्ल्ड कपचा फायनल सामना 18 डिसेंबरला कतारच्या लुसेल स्टेडियमवर फ्रान्स आणि अर्जेंटिना (Argentina vs France) यांच्यात खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता सुपर मंडेला कोणता संघ बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.(FIFA World Cup 2022 France struck by cold virus ahead of World Cup final)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वजण फायनलची वाट पाहत असताना आता फ्रान्सच्या (France Football News) चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. अतिमहत्वाच्या सामन्याला काही तासांचा अवधी शिल्लक असताना फ्रान्सचे काही खेळाडू आजारी (France struck by cold virus) पडल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे आता दोन वेळेच्या विश्वविजेत्या संघाचं टेन्शन वाढलंय. तीन बडे खेळाडू व्हायरसच्या (France football Players Hit By Cold) विळख्यात अडकल्याचं सांगितलं जातंय.



इब्राहिमा कोनाटे (Ibrahima Konate), किंग्सले कोमन (Kingsley Coman) आणि राफेल वाराने (Raphael Varane) या तीन खेळाडूंना कोल्ड व्हायरसची (Cold Virus) लागण झाल्याची माहिती फ्रेंच मीडियाच्या रिपोर्टनुसार मिळाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी संघासोबत सराव न करता लांब सराव केला. तर काही वेळा ते मैदानात देखील दिसले नाहीत. त्यामुळे आता फायनल सामन्यात हे खेळाडू खेळणार की नाही?, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दिसत आहेत.


आणखी वाचा - FIFA World Cup Final : 'फायनलसाठी तो फिट नाही'; Lionel Messi च्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर


दरम्यान,  रविवारी अर्जेंटिनाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्सने (Didier Deschamps) त्यांचे सर्व खेळाडू निरोगी राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. अर्जेंटिना 36 वर्ष वर्ल्ड कपचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे फ्रान्स सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने जात आहे. दोन्ही संघ आपापल्या इतिहासात 12 वेळा आमनेसामने (Argentina vs France head to head) आले आहेत, ज्यामध्ये अर्जेंटिनाचे 6 विजय, 3 सामने ड्रॉ राहिलेत तर 3 वेळा फ्रान्सचे सामना जिंकला आहे. त्यामुळे आता उद्याच्या सामन्यात अर्जेंटिनाचं पारडं जड असल्याचं दिसतंय.