FIFA World Cup 2022 Prize Money : अखेर अर्जेंटिनाने फायनल सामन्यात फ्रान्सचा (FIFA WorldCup 2022)  पराभव करत थरारक विजय मिळवला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा ( Argentina) विजय झाला पण  फ्रान्सनेही (France) तितकीच कडवी झुंज दिली. (FIFA World Cup 2022 Full Award List) सामना अगदी पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला होता. त्यावेळी फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. मात्र फ्रान्स संघाचा पराभव झाला असला तरी या अर्जेंटिनासोबतच इतर संघ ही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिफा विश्वचषक 2022 च्या विजेतेपदाच्या लढतीत लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi)  संघ अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून इतिहास रचला. याआधी अर्जेंटिनानं 1978 आणि 1986 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनानं विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं आहे. विश्वचषक विजेता संघ अर्जेंटिनाला त्यांच्या फुटबॉल महासंघाकडून 4 कोटी 20 लाख रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे, पराभूत फ्रान्सला 30 दशलक्ष डॉलर्स दिले जातील. फ्रान्सने 2018 मध्ये विश्वचषक जिंकला तेव्हा बक्षिसाची रक्कम 38 दशलक्ष डॉलर्स होती.


तिसऱ्या आणि चौथ्या संघावर पैशांचा पाऊस


तिसऱ्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाला (Croatia) $27 दशलक्ष तर चौथ्या स्थानावरील मोरोक्कोला $25 दशलक्ष मिळाले. सामन्याच्या पूर्ण वेळेपर्यंत स्कोअर बरोबरीचा होता आणि दुखापतीचा वेळ संपल्यानंतर स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. अर्जेंटिनाचा स्टार गोलकीपर मार्टिनेझने पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन गोल वाचवून मेस्सीचे स्वप्न साकार केले.


वाचा : Lionel Messi चं स्वप्न अखेर पूर्ण; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाचा थरारक विजय!!! 


मेस्सीच्या नावावर खास विक्रम


अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनेल मेस्सी फ्रान्सच्या अंतिम फेरीत उतरल्याने मेस्सी फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक कॅप खेळणारा खेळाडू ठरला. मेस्सीचा हा 26 वा सामना होता. त्याने 25 सामन्यांत जर्मनीच्या लोथर मॅथॉसला मागे टाकले.


अर्जेंटिनाने तिसरे विजेतेपद पटकावले


अर्जेंटिनाने तिसरे विजेतेपद पटकावले. पाच विश्वचषक विजेतेपदांसह ब्राझील या यादीत आघाडीवर आहे. विश्वचषक विजेतेपद मिळविलेल्या देशांची यादी. ब्राझील, पाच वेळा (1958, 1962, 1970, 1994, 2002) जर्मनी चार वेळा (1954, 1974, 1990, 2014) इटली चार वेळा (1934, 1938, 1982, 2006 वेळा) अर्जेंटिना, फ्रान्स, 921, तीन) दोनदा (1998, 2018) उरुग्वे दोनदा (1930, 1950) इंग्लंड एकदा (1966) स्पेन एकदा (2010)


अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकण्यासाठी $42 दशलक्ष 
पराभूत झालेल्या फ्रान्स संघाला $30 दशलक्ष 
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांनाही लॉटरी 


अर्जेंटीना स्क्वॉड 


गोलकीपर: एमिलियानो मार्टिनेज, गेरोनिमो रुल्ली, फ्रेंको अरमानी. 
डिफेंडर: नहुएल मोलिना, गोंजालो मोंटिएल, क्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेजेला, निकोलस ओटामेंडी, लिसेंड्रो मार्टिनेज, मार्कोस एक्यूना, निकोलस टैगेलियाफिको, जुआन फोयथ. 
मिडफील्डर: रोड्रिगो डी पॉल, लिएंड्रो परेडेस, एलेक्सिस मॅकएलिस्टर, गुइडो रोड्रिग्ज, एलेजांद्रो गोमेज, एंजो फर्नांडीज, एक्सेक्विएल पलासियोस. 
फॉरवर्ड: लियोनेल मेसी, एंजेल डि मारिया, लुटारो मार्टिनेज, जूलियन अल्वारेज, निकोलस गोंजालेज, जोकिन कोरिया, पाउलो डायबाला.


फ्रान्स स्क्वॉड 


गोलकीपर: अलफोंसे एरिलो, ह्यूगो लॉरिस, स्टीव मनडाडा 
डिफेंडर: लुकास हर्नांडेज, थियो हर्नांडेज, इब्राहिम कोनाते, जूल्स कोंदे, बेंजामिन पावर्ड, विलियम सालिबा, दायोत उपामेकानो, राफेल वराने 
मिडफील्डर: एडुआर्डो कॅमाविंगा, यूसुफ फोफाना, मेटियो गुंदॉजी, एड्रियन रेबियट, ऑरेलियन टचॉमेनी, जोर्डन वेरेटॉट 
फॉरवर्ड: करीम बेंजेमा, किंग्स्ली कोमेन, उस्माने डेम्बले, ओलिविर जिरूड, एंटोनी ग्रीजमॅन, कीलियन एम्बाप्पे, मार्कस थुरम, रँडल कोलो मुआनी