FIFA World Cup 2022 : सध्या फिफाच्या फायनचा जोश पाहयला मिळत आहे. आज (18 December) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अखेरचा सामना खेळला जाणार आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या फ्रान्सचा सामना अर्जेंटिनाशी (France vs Argentina) कतारच्या लुसेल स्टेडियमवर होणार आहे. फ्रान्सच्या विजयाची जबाबदारी स्टार स्ट्रायकर कीलियन एम्बाप्पे आणि ओलिवर जिरूड या खेळाडूंच्या खांद्यावर असेल. त्याचवेळी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) अंतिम सामना जिंकून विजेतेपदासह विश्वचषकातून निरोप घेऊ इच्छितो, त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार आहे.  हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र फिफा फायनलपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर येते. या फायनलमध्ये फ्रान्सचा विजय झाल्यास फ्रान्समधील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आजच्या दिवशी सर्वांना फ्री सेक्स सेवा देतील. अशी घोषणा या महिलांना केली आहे. त्यामुळे सध्या या अजब ऑफरची चर्चा सर्वदूर होत आहे.


बुधवारी (दि.14) मोरोक्कोविरुद्ध झालेल्या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दरम्यान, फिफाच्या अंतिम सामन्याला फक्त काही तास शिल्लक असताना, फ्रान्सचा संघ अडचणीत सापडला आहे. संघातील खेळाडू एकामागून एक आजारी पडत आहेत. मोरोक्को-  फ्रान्स (France)  सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  


वाचा : WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, टीम इंडिया फायनलच्या दिशेने मात्र 'या' संघाकडून धोका कायम


आज, रविवारी होणार्‍या अंतिम फेरीत (FIFA World Cup) अर्जेंटिना आणि फ्रान्स एकमेकांशी भिडतील. अंतिम सामना अनेक प्रकारे भावनिक असेल कारण, हा मेस्सीचा शेवटचा विश्वचषक सामना असेल. मेस्सीने अनेक वर्षांपासून विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न जपले आहे आणि यावेळी त्याला ही ट्रॉफी मिळवण्याची शेवटची संधी असणार आहे. 


दोन्ही संघांची ताकद आणि कमकुवतता
अर्जेंटिना -


ताकद: कर्णधार लिओनेल मेस्सीवर अवलंबून आहे. इतर खेळाडूही गोल करत आहेत. पूर्वार्धात गोल करून संघ अधिक आक्रमकपणे खेळतो.


कमजोरी: टीमविरुद्ध आतापर्यंत पाच गोल झाले. डिफेंस ही संघाची कमकुवतता आहे आणि मेस्सीवर जास्त अवलंबून राहणे देखील नुकसानकारक ठरू शकते.


फ्रान्स -


ताकद: स्ट्रायकर्स ही फ्रान्सच्या संघाची ताकद आहे. एम्बाप्पे, जिरूड, ग्रीजमैन या त्रिकुटाने चमकदार कामगिरी केली आहे.


कमजोरी: डिफेंसबाबत थोडी काळजी आहे. या विश्वचषकात गतविजेत्या फ्रान्सविरुद्धही पाच गोल झाले आहेत.